VIDEO: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार?; नव्या समीकरणाच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (sanjay raut,)

VIDEO: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार?; नव्या समीकरणाच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात...
sanjay raut
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 12:40 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चांनी जोरही धरला आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच खुलासा केला आहे. अशी स्वप्नं पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. (no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)

संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. त्याविषयी मी त्यांच्याशी संवाद साधला. पण तुम्हाला वाटतं तसे राजकारण यात नाही, असं राऊत म्हणाले.

पवारांचे आघाडीला आशीर्वाद

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या आशीर्वादाने सरकार चालू असल्याचं विधान केलं आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे वयाने, अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ते मान्य केलं आहे. अमोल कोल्हे राणा भीमदेवी थाटात बोलले असतील. पण हे तीन पक्षांचे सरकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

भगवाखाली उतरणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिकमध्ये भेटले. त्यामुळे मनसे आणि भाजप एकत्र येण्याची चिन्हे आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. अशी समीकरणे राजकारणात होत असतात. पण महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा खाली उतरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यकर्त्यांशी मतभेद असू शकतात

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले तर उत्तर प्रदेश सोडून जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यावरही राऊत म्हणाले, या देशात राज्यकर्त्यांशी मतभेद असू शकतात. राज्यकर्त्यांशी मतभेद असले तरी देशात कुणाला असुरक्षित वाटू नये.

आरक्षणावर ठोस निर्णय घ्यायला सांगू

उद्या सोमवारी लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक झाली. देशातील महागाई, कोव्हिड, पेट्रोल दरवाढ, लडाखमध्ये चीनची घुसखोरी आदी विषयांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहे. या बैठकीत ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर उपस्थित करून त्यांना ठोस निर्णय घ्यायला सांगू, असंही ते म्हणाले. (no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

पंतप्रधानांशी तासभर भेट, सर्वपक्षीय बैठकीला जाताना राऊतांसोबत, येताना खरगेंसोबत; पवार नीतीचा अर्थ काय?

केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा

VIDEO: अखेर वेळा जुळल्या, राज ठाकरे-चंद्रकांतदादांची 15 मिनिटं खलबतं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

(no new equation in maharashtra with bjp, says sanjay raut)

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.