AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण शांतताही राखा; मोदींचं विरोधकांना आवाहन

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा, आम्ही खुल्या चर्चेला तयार, पण शांतताही राखा; मोदींचं विरोधकांना आवाहन
pm narendra modi
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 10:55 AM
Share

नवी दिल्ली: संसदेत प्रश्न विचारा, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज बुलंद करा. पण संसदेत शांतता राखा. संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवा, असं आवाहन करतानाच आम्ही कोणत्याही खुल्या चर्चेला तयार आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मीडियाशी संवाद साधून सरकारची भूमिका व्यक्त करतानाच विरोधकांकडून सरकारच्या अपेक्षाही विशद केल्या. भविष्यात संसदेचं मूल्यमापन करताना संसद कशी चालवली आणि किती चांगलं योगदान दिलं गेलं याचं मूल्यमापन केलं गेलं पाहिजे. कोणी किती विरोध केला आणि जोर लावला हे मूल्यमापनाचे मानदंड असू शकत नाही. संसदेत किती तास काम झालं. कोणत्या विषयावर काम केलं हे महत्वाचं आहे, असं सांगतानाच आम्ही कोणत्याही चर्चेला तयार आहोत. कोणत्याही प्रश्नाची उत्तरे द्यायला तयार आहोत. तुम्ही संसदेत प्रश्न विचारा. पण संसदेत शांतताही राखा, असं आवाहन मोदींनी केलं.

संसदेची प्रतिष्ठा राखा

संसदेत सरकारच्या विरोधात सरकारच्या धोरणाविरोधात जेवढा आवाज बुलंद करायचा तेवढा करा. पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. तरुणांना आदर्श मिळेल असं वर्तन करा. या अधिवेशनात सकारात्मक आणि सचेत कार्य झलं पाहिजे, असं ते म्हणाले.

नव्या विषाणूपासून सावध राहा

गेल्यावेळी कोरोनाचं संकट होतं. त्यावेळीही अधिवेशन घेतलं. त्यानंतर सरकारने कोरोना रोखण्यासाठी विशेष काम केलं. देशाने 100 कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं. आता आपण 150 कोटींच्या जवळ जात आहोत. आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

देशहितासाठी चर्चा करा

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. देशात चारही दिशांमध्ये रचनात्मक, सकारात्मक आणि जनहितासाठी राष्ट्रहितासाठी सामान्य नागरिक अनेक कार्यक्रम करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी पावलं उचलत आहेत. स्वातंत्र्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिकही कोणती ना कोणती जबाबदारी पार पाडत आहे. या गोष्टी देशाच्या उज्वल भविष्यासाठी शुभ संकेत आहेत. काही दिवसांपूर्वी संविधान दिवसही नव्या संकल्पनेसह उत्साहात साजरा करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन आणि येणारे अधिवेशनही स्वातंत्र्य वीरांच्या ज्या भावना होत्या त्यानुसार चालेल अशी अपेक्षा आहे. संसदेत देशहितासाठी चर्चा करा, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग शोधा. नवे उपाय शोधा त्यासाठी हे अधिवेशन विचाराच्या समृद्धीवाले आणि दूरगामी निर्णय घेणारे व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

Covid Vaccine: लस घेतलीये, पण ती ओमिक्रॉन वेरिएंटविरोधात प्रभावी आहे का? वाचा AIIMS चे प्रमुख काय म्हणतात

ज्या त्रिपुरातल्या घटनांवर महाराष्ट्रात दंगली उसळल्या तिथं नेमकं कोण जिंकलंय? भाजपा की ममता बॅनर्जी?

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.