पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करणार; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करणार आहे. कोरोना काळातील हे त्यांचं 11 वं संबोधन असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात संबोधित करणार; काय बोलणार याकडे देशाचं लक्ष
narendra modi
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 8:55 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करणार आहे. कोरोना काळातील हे त्यांचं 11 वं संबोधन असणार आहे. मात्र, ते कोणत्या विषयावर देशाशी संवाद साधणार हे गुलदस्त्यात असल्याने त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसाच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वीच ते आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधति करणार आहेत. मोदींनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. आज गुरू नानक यांचं प्रकाश पर्व आहे. सिंचन प्रकल्पांच्या लोकार्पणासाठी आज उत्तर प्रदेशातील महोबा येथे जाणार आहे. संध्याकाळी झांशीमध्ये राष्ट्र रक्षा समर्पण पर्वात सहभागी होणार आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

काय बोलणार? उत्सुकता वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याची उत्सुकता वाढली आहे. सूत्रांच्या मते मोदी कोरोना संदर्भात काही घोषणा करू शकतात. मात्र, त्या व्यतिरिक्त इतर विषयांवरही ते बोलू शकतात असं सांगितलं जात आहे. त्यामुळे मोदींच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

मोदींचे आतापर्यंत 10 वेळा देशाशी संबोधन

>> कोरोना काळात 19 मार्च 2020मध्ये त्यांनी पहिल्यांदा देशाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. जनतेनेच हा कर्फ्यू पाळायचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 29 मिनिटाच्या या भाषणात त्यांनी लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचं आवाहन केलं होतं.

>> त्यानंतर 24 मार्च 2020 रोजी त्यांनी रात्री 8 वाजता देशाला संबोधित करत 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला होता. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व गोष्टी त्यांनी बंद ठेवण्याची घोषणा केली होती.

>> 3 एप्रिल 2020 रोजीही त्यांनी देशाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी लाईट बंद करण्याच आवाहन केलं होतं. कोरोनाच्या संकटात एकजूटपणे उभं राहण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलं होतं.

>> 14 एप्रिल 2020 रोजी त्यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला.

>> 12 मे 2020 रोजी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 20 लाख कोटी रुपयाचं आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी संकट ही संधी मानून काम करण्याचं आवाहन केलं होतं.

>> 30 जून 2020 रोजी अन्न योजनेचा अवधी त्यांनी नोव्हेंबरपर्यंत वाढवला. देशातील 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

>> 20 ऑक्टोबर 2020मध्ये त्यांनी पुन्हा संवाद साधला. जोपर्यंत कोरोनाची लस येत नाही तोपर्यंत गाफिल राहू नका. काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी केलं होतं.

>> 20 एप्रिल 2021 रोजी त्यांनी पुन्हा देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्याचं जनतेला आवाहन केलं. यावेळी त्यांनी देशात लसीकरण वेगानं होत असल्याचंही सांगितलं होतं.

>> 7 जून 2021 रोजी मोदींनी नव्या व्हॅक्सीन धोरणाची घोषणा केली. तसेच मोफत लस देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच गरीब कल्याण योजना दिवाळी आणि छठ पूजेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

>> 22 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी 100 कोटी डोस पुरविण्यात आल्याचं सांगितलं. हे देशाचं यश असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं.

संबंधित बातम्या:

उदयनराजे कुठं आहेत? बंधुराजांचा विषय रामराजेंना विचारला पाहिजे, शिवेंद्रराजेंची मिश्किल टिप्पणी

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महापालिकेत 52 जागांसाठी भरती, 17 ते 75 हजारांपर्यंत मानधन

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....