Padma Awards: कंगना, अदनान सामींसह 102 मान्यवरांचा पद्मश्रीने गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. यावेळी 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. (Padma Awards List)
नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 119 मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. यावेळी 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. तर 16 मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
2020साठी या मान्यवरांना पद्म विभूषण पुरस्कार
जॉर्ज फर्नांडिस (मरणोपरांत) अरुण जेटली (मरणोपरांत) सुषमा स्वराज (मरणोपरांत) मॉरिशसचे माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ (मरणोपरांत) उत्तर प्रदेशातील पंडित छन्नूलाल मिश्र मेरी कौम पेजावर मठाचे श्री विश्वेशतीर्थ स्वामी (मरणोपरांत)
2021साठी पद्म विभूषण
जापानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोपरांत) मौलाना वहीद्दीन खान डॉ. बेला मोन्नपा हेगडे बीबी लाल नरिंदर सिंह कपानी सुदर्शन साहो
Actor Kangana Ranaut receives the Padma Shri Award 2020. pic.twitter.com/rIQ60ZNd9i
— ANI (@ANI) November 8, 2021
पद्म भूषण
कृष्णन नायर शांतकुमारी (कला, केरळ) तरुण गोगोई ( मरणोपरांत) चंद्रशेखर कंबरा (साहित्य, कर्नाटक) सुमित्रा महाजन नृपेंद्र मिश्र (नागरी सेवा) रामविलास पासवान (मरणोपरांत) केशुभाई पटेल (मरणोपरांत) कल्बे सादिक (मरणोपरांत) रजनीकांत देवीदास (उद्योग, महाराष्ट्र) तरलोचन सिंह
पद्मश्री
मृदुला सिन्हा (मरणोपरांत) पीटर ब्रुक (कला) फादर वेल्स (मरणोपरांत) प्रा. चमनलाल सप्रु (मरणोपरांत) अदनान सामी (कला) कंगना राणावत (कला)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 November 2021 https://t.co/fBUtfl6MbK #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021
संबंधित बातम्या:
एसटी कर्मचाऱ्यांचा संप कधी मिटणार?, एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते म्हणतात…
(