पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार?; चौथ्या दौऱ्यात लुम्बिनीलाही भेट देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या डिसेंबरमध्ये नेपाळमध्ये जाण्याची शक्यता आहे. भारत आणि नेपाळमध्ये साजऱ्या होणाऱ्या विवाह पंचमीच्या निमित्ताने 8 डिसेंबर रोजी मोदी नेपाळ दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. (Prime Minister Narendra Modi may visit Nepal in December may visit Lumbini this time)

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार?; चौथ्या दौऱ्यात लुम्बिनीलाही भेट देणार
Prime Minister Narendra Modi
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 6:33 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या डिसेंबरमध्ये नेपाळमध्ये जाण्याची शक्यता आहे. भारत आणि नेपाळमध्ये साजऱ्या होणाऱ्या विवाह पंचमीच्या निमित्ताने 8 डिसेंबर रोजी मोदी नेपाळ दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. ब्रिटनच्या ग्लासगोमध्ये मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांची भेट झाली होती. त्यानंतर मोदींच्या नेपाळ भेटीच्या चर्चेने जोर धरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात भारताच्या सहकार्याने तयार झालेल्या जयनगर-जनकपूर रेल्वे सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय बिहारच्या रक्सौलपासून नेपाळच्या काठमांडूपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याच्या योजनेचा शिलान्यासही मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

लुम्बिनीलाही जाण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दौऱ्यात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान असलेल्या लुम्बिनीलाही जाण्याची शक्यता आहे. बुद्ध सर्किट म्हणून लुम्बिनिला भारतातील बौद्धस्थळांशी जोडण्याची मोदींनी यापूर्वीच इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी मोदी नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पशुपतिनाथ, मुक्तिनाथ आणि जनकपूर धामचे त्यांनी दर्शन घेतलं होतं.

दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यावर भर असेल

गेल्या काही महिन्यांपासून नेपाळ आणि भारताच्या संबंधात कटुता आली होती. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी चीनची उघड उघड बाजू घेतली होती. एवढेच नव्हे तर नेपाळ-भारत सीमेवरील काही भाग नेपाळने आपल्याच सीमेत दाखवला होता. तसेच तसं विधेयकही त्यांनी संसदेत पारित करून भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता नेपाळमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर नेपाळ आणि भारताच्या संबंधात सुधारणा होऊ लागली आहे. ब्रिटनच्या ग्लासगोमध्ये मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांची भेट झाली. यावेळी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी एकमेकांना एकमेकांच्या देशात येण्याचं आवतन दिलं आहे.

नुकतीच भारत आणि नेपाळदरम्यान संरक्षणाच्या मुद्द्यावर द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांच्या दरम्यान प्रशिक्षण आणि सुरक्षा दलावर चर्चा झाली. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मोदींचे दौरे सुरू

दरम्यान, कोरोना संकट ओसरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा परदेशात जाऊन द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला आहे. ते नुकतेच ब्रिटनला गेले होते. ब्रिटनमध्ये त्यांनी जी-20 परिषदेत सहभाग घेतला होता. त्यापूर्वी पश्चिम बंगालच्या निवडणुकीवेळी मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. आता मोदी नेपाळच्या दौऱ्यावर जाणार असल्याने भारत आणि नेपाळमधील संबंधात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?

अनिल देशमुखांच्या मुलाला अटकेची भीती; कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार

शेतकऱ्यांनी साधला पाडव्याचा मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

(Prime Minister Narendra Modi may visit Nepal in December may visit Lumbini this time)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.