Sanjay Raut : शिवसेनेचा वर्धापन दिन होणार की नाही?; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांनी बैठक बोलावली होती. त्यावर राऊतांनी भाष्य केलं. मी त्या बैठकीला नव्हतो. ममतादीदींनी बैठक बोलावली होती. सुभाष देसाई हे बैठकीला होते.

Sanjay Raut : शिवसेनेचा वर्धापन दिन होणार की नाही?; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेचा वर्धापन दिन होणार की नाही?; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 10:54 AM

अयोध्या: येत्या 19 जून रोजी शिवसेनेचा (shivsena) वर्धापन दिन आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापण दिन दणक्यात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यसभा निवडणुकीतील पराभव, विधान परिषदेची निवडणूक आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे परखड मत व्यक्त करतील असंही सांगितलं जात होतं. पण त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी एक मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाबाबतचं हे विधान आहे. शिवसेनेचा वर्धापण दिन ठरवला आहे. पण मुंबईत रोज साडेतीन हजाराच्या जवळपास रुग्ण सापडत आहेत. वर्धापन दिन घेतला तर गर्दी वाढेल. त्यामुळे त्यावर आता बोलता येणार नाही, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा वर्धापन दिन होणार की नाही याबाबतची साशंकता व्यक्त केली जात आहे.

संजय राऊत अयोध्येत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांनी बैठक बोलावली होती. त्यावर राऊतांनी भाष्य केलं. मी त्या बैठकीला नव्हतो. ममतादीदींनी बैठक बोलावली होती. सुभाष देसाई हे बैठकीला होते. शरद पवार होते. तामिळनाडूतून टीआर बालू होते. प्रत्येक राजकीय पक्षाने आपला प्रतिनिधी पाठवला होता. सहमतीने कोणता उमेदवार ठरवतात हे पाहावं लागेल. सहमतीच्या उमेदावारापेक्षा देशाला मान्य होईल असा उमेदवार हवा. रबर स्टॅम्प मिळतील. पण राष्ट्रपती मिळणार नाही. प्रणव मुखर्जी, अब्दुल कलाम हे थोर लोकं होते. असाच राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार दिला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंना अयोध्या भेटीचं निमंत्रण

साधू महंतांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. अयोध्येतील जनतेने बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. शशिकांतदास महाराज यांनी महाआरती केली. गजर केला. सर्व अयोध्येने स्वागत आमचं स्वागत केलं. ऐतिहासिक असा हा दौरा होता. बृजभूषण सिंह यांनी आदित्य ठाकरेंशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनीही शुभेच्छा दिल्या. त्यांना काल यायचं होतं. पण ते कामामुळे येऊ शकले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.