ज्या पत्रकाराची स्टोरी पाहण्यासाठी देश वाट पाहायचा, एनडीटीव्हीचे पत्रकार कमाल खान यांचं दु:खद निधन
एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज सकाळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अंतिम श्वास घेतला.
लखनऊ: एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आज सकाळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अंतिम श्वास घेतला. कमाल खान यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी कमाल खान यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. कमाल खान हे लखनऊच्या बटलर पॅलेस येथील सरकारी बंगल्यात राहत होते. त्यांची पत्नी रुची कुमार या सुद्धा पत्रकार आहेत. कमाल खान हे एनडीटीव्हीत कार्यकारी संपादक होते. त्यांना रामनाथ गोयंका पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
लिजेंड पत्रकार गमावला
कमाल खान यांच्या निधनावर पत्रकारिता क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांनी खान यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. कमाल खान यांच्या अचानक जाण्याचा तीव्र धक्का बसला आहे. कमाल आणि रुचीने माझ्यासोबत लखनऊमध्ये नवभारत टाइम्समध्ये काम केलं होतं. कमाल खान हे अत्यंत संतुलित पत्रकार होते. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
कमाल खान यांनी 13 तासांपूर्वीच उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचं कव्हरेज केलं होतं. हा व्हिडिओ शेअर करत पत्रकार अमन शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. द लिजेंड कमाल खान यांचा शेवटचा पीटीसी. पीटीसीसाठी ते प्रसिद्ध होते. ही कालचीच गोष्ट आहे. आज ते आपल्यात नाहीत. जीवन इतकं चंचल आहे, असं शर्मा यांनी म्हटलं आहे.
We are all devastated by the loss of Kamal Khan, an NDTV veteran and one of the country’s best journalists. pic.twitter.com/NZSS2bQOR5
— NDTV (@ndtv) January 14, 2022
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही कमाल खान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. कमाल खान यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. काल रात्रीपर्यंत रिपोर्टिंग करणारे कमाल खान आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/GtnBm124ak#BREAKING | #BreakingNews | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2022
संबंधित बातम्या:
चंद्रकांत पाटलांसह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल; संजय राऊतांनाच खोचक टोला
Corona Cases India : कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच, 2 लाख 64 हजार रुग्णांची नोंद, 315 मृत्यूंची नोंद