VIDEO: उत्तर प्रदेशात ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ मॅरेथॉनमध्ये चेंगराचेंगरी, किंचाळ्या आणि गोंधळ; सुदैवाने मोठी हानी टळली
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही लडकी हूँ, लड सकती हूँ ही मोहीम हाती घेतली आहे.
बरेली: उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही लडकी हूँ, लड सकती हूँ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बरेलीत मुलींसाठी एका मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक मुली दबल्या गेल्या. त्यामुळे किंचाळ्या आणि गोंधळामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही.
सोमवारी बरेलीत बिशप मंडल इंटर कॉलेजातील मैदानावर सकाळी 10 वाजता धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रियंका गांधी यांच्या लडकी हूँ, लड सकती हूँ या मोहिमेंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, स्पर्धा सुरू होताच काही वेळात एका मुलीचा दुसऱ्या आणि दुसऱ्या मुलीचा तिसरीला धक्का बसला. त्यामुळे काही मुली खाली पडल्या. त्यानंतर पाठीमागून आलेल्या मुलींचा लोंढा या मुलींवर कोसळून चेंगराचेंगरी झाली. मुली एकमेकींवर आदळल्यानंतर प्रचंड घाबरल्या होत्या. या मुलींनी एकच आरडाओरड सुरू केली. वाचवा वाचवाचा टाहो केला. या घटनेत अनेक मुली जखमी झाल्या आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी दुर्देवी घटना घडली नाही.
तीन मुली रुग्णालयात
या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या तीन मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
माजी महापौरांचं धक्कादायक विधान
दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर सुप्रिया ऐरन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. वैष्णोदेवीच्या मंदिरात चेंगराचेगरी होऊ शकते, ही तर मुलींची गर्दी आहे. ही मानवी दुर्घटना आहे. मात्र, मीडियातील लोकांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल मी दिलगीर आहे, असं विधान ऐरन यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या घटनेमागे काही षडयंत्र असू शकतं. काँग्रेसचा जनाधार वाढत असल्याने हे षडयंत्र रचलं गेलं असावं, असा दावा त्यांनी केला.
#WATCH | Stampede occurred during Congress’ ‘Ladki hoon, Lad Sakti hoon’ marathon in Bareilly, Uttar Pradesh today pic.twitter.com/nDtKd1lxf1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 4, 2022
संबंधित बातम्या:
Weekend Curfew | राजधानीत विकेंड कर्फ्यू लागू, नवी नियमावली जारी, नेमकं काय सुरु? काय बंद?
मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !
तामिळनाडूतील तंजावरमध्ये सापडले 500 कोटींचे शिवलिंग, पोलिसांनी केले जप्त