आरंभ झालाय, अजून लोक जोडले जातील, तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं विधान

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक नसल्याचा दावाही केला जात आहे. (Shatrughan Sinha)

आरंभ झालाय, अजून लोक जोडले जातील, तिसऱ्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न सिन्हा यांचं मोठं विधान
Shatrughan Sinha
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 7:14 PM

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक नसल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे. तिसऱ्या आघाडीचा हा आरंभ सुरू झाला आहे. यात अजून लोक जोडल्या जातील. ही मोहीम संपूर्ण देश ढवळून काढेल, असा विश्वास शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केला आहे. (This Campaign Will Pay Off In The Country: Shatrughan Sinha)

शत्रुघ्न सिन्हा यांनी एनडीटीव्हीशी चर्चा करताना हा विश्वास व्यक्त केला आहे. यशवंत सिन्हा हे स्टेट्समन आहेत. त्यांच्या आणि देशातील सर्वात मोठे राजकीय चाणक्य शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्वजण एकत्र येत आहेत. सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आज सुरुवात झालीय. यापुढे आणखी लोक यात समील होतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. त्याही आमच्यासोबत आहेत. जर नसतील तर येतील, असा दावाही त्यांनी केला.

दक्षिण भारतातील पक्षही सामील होतील

देशात काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मीही या बैठकीला जाणार होतो. पण काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. मात्र, या घडामोडीतून चांगलं निष्पन्न होईल. दक्षिण भारतातील बहुतेक पक्षही जोडले जातील. भाजपने धन शक्ती आणि भय शक्तीचा प्रयोग केला. मात्र, आता काही लोकांचे डोळे उघडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकांना फोडलं जातं. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसमधील नेतृत्वाचं संकट दूर होईल

तुम्ही तुमच्या वैचारिक आस्थेने एखाद्या पक्षात आला तर ठिक आहे. सध्या सर्वात प्रतिभावान लोक काँग्रेसमध्ये आहेत. यातील काही लोकांची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यावर तोडगा निघेल. आता मुद्द्यापासून दूर होऊन चालणार नाही. काँग्रेसमधील नेतृत्वाच्या संकटावर मात केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (This Campaign Will Pay Off In The Country: Shatrughan Sinha)

संबंधित बातम्या:

LIVE : शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले, ‘राष्ट्रमंच’च्या बैठकीकडे देशाचं लक्ष

पवारांच्या घरी बैठक होणार, पण तिसऱ्या आघाडीसाठी नाही; तरीही तर्कवितर्क सुरूच!

तिसऱ्या आघाडीचं मॉडेल गैरलागू, तिसरी-चौथी आघाडी भाजपला आव्हान देईल असं वाटत नाही; प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

(This Campaign Will Pay Off In The Country: Shatrughan Sinha)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.