तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू; विनायक राऊतांचा इशारा

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. (vinayak raut slams narayan rane over prahar article)

तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू; विनायक राऊतांचा इशारा
Vinayak Raut
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 4:21 PM

नवी दिल्ली: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

विनायक राऊत यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रहारमध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत, असं सांगतानाच आम्हीही राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

शहा-फडणवीस भेटीवर नो कमेंट

काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस शहा यांची भेट ही पक्षांतर्गत चर्चेसाठी असेल. पक्षांतर्गत गाठीभेटीवर मला काही बोलायचं नाही. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असं त्यांनी सांगितलं.

तपास यंत्रणांना कानपिचक्या

यावेळी त्यांनी तपास यंत्रणांनाही कानपिचक्या दिल्या. तपास यंत्रणांनी आपलं काम करावं. पण काम करत असताना दबावाखाली करू नये. तपास करताना प्रसिद्धीचा स्टंट केला जातो. तपास यंत्रणांनी घाबरवण्याचे काम करू नये हे नरेंद्र मोदींच मत योग्यच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आमचं हिंदुत्व वेगळं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेनेच हिंदुत्व आणि मनसे, भाजपचे हिंदुत्व यात जमीन अस्मानचा फरक आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर हे शिवसेनेचं वेगळं नातं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

पंकजाही गडकरींच्या भेटीला

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज अचानक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल तासभर ही भेट चालली. त्यानंतर पंकजा यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत राजकीय चर्चा झाली का? असा सवाल पंकजा यांना करण्यात आला. त्यावर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. माझ्या जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन गडकरींना भेटले. प्रीतम मुंडे, आमदार माधुरी मिसाळही सोबत होत्या. विकास कामांचा विषय होता. त्यांनी आमच्या भागातील विकास कामे केली आहेत. गडकरींनी परळीला भरभरून दिलं आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. तसेच काही छोटीमोठी कामे प्रलंबित होती. ती त्यांनी लगेच मार्गी लावली. जागच्या जागीच त्यांनी कामाचा निपटारा केला. ती गडकरींची स्टाईल आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये खलबतं, केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात व्यूहरचना?

परमबीर सिंहांना अटकेपासून संरक्षण देण्यास राज्य सरकारचा नकार, ठाणे प्रकरणी नेमकं काय होणार?

असं काय आहे की 13 दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळत नाहीय? वाचा 5 कारणे

(vinayak raut slams narayan rane over prahar article)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.