घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याच्या मुलाचं IPL मध्ये फळफळेल नशीब; 2022च्या लिलावात लागू शकते मोठी बोली
रिंकू सिंह एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्याचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवायचे काम करायचे. मोठा भाऊ रिक्षा चालवायचा. पण रिंकूने आपल्या मेहनतीने कुटुंबाला आज चांगले दिवस दाखवलेत.
Follow us
विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धेत पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये यूपीच्या संघाला हिमाचल प्रदेशने पाच विकेटने पराभूत केले. या पराभवामुळे यूपीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. यूपीने या सीझनमध्ये चांगलं प्रदर्शन केलं. पण एका चुकीमुळे ते स्पर्धेबाहेर गेले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत यूपीच्या एका फलंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रिंकू सिंह असं या फलंदाजाचं नाव असून त्याने या स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या.
मधल्या फळीत खेळणाऱ्या डावखुऱ्या रिंकू सिंहने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सहा डावात 379 धावा केल्या. रिंकूची फलंदाजीची सरासरी 94.75 होती.
रिंकू सिंहने या स्पर्धेत एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावली. त्याने 36 चौकार आणि सहा षटकार खेचले. पुढच्यावर्षी होणाऱ्या आयपीएल 2022 च्या मोसमात या कामगिरीचा रिंकूला फायदा होऊ शकतो.
रिंकू सिंह कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. 2018 मध्ये या फलंदाजाला केकेआरने 80 लाख रुपयांना विकत घेतले होते. रिंकूला आयपीएलमध्ये फार संधी मिळालेली नाहीय. आठ डावात 11 च्या सरासरीने त्याने 77 धावा केल्या आहेत. रिंकू आता चांगल्या फॉर्ममध्ये असून संधी मिळाली, तर स्वबळावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
रिंकू सिंह एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. त्याचे वडिल घरोघरी सिलेंडर पोहोचवायचे काम करायचे. मोठा भाऊ रिक्षा चालवायचा. पण रिंकूने आपल्या मेहनतीने कुटुंबाला आज चांगले दिवस दाखवलेत.