उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

शिष्टाचारानुसार कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणाले होते. (bjp leader chandrakant patil slams cm uddhav thackeray)

उद्धव ठाकरे मोदींना 'चोर' म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल
chandrakant patil
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:03 AM

मुंबई: शिष्टाचारानुसार कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांना अटक करता येत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना चोर म्हणाले होते. मग त्याचं काय करणार?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. (bjp leader chandrakant patil slams cm uddhav thackeray)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना हा सवाल केला. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या 20 महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल त्यांनी केला.

राठोडचं काय झालं?

राणेंची एक कार्यपद्धती आहे. त्यांची बोलण्याची स्टाईल आहे. रावसाहेब दानवेंची एक बोलण्याची स्टाईल आहे. त्यातून समजा एखादा आक्षेपहार्य शब्द आला असेल तर थेट केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक? त्याला काही समज देणं किंवा त्याच्यावर म्हणणं हे असं शकतं. एखाद्या नेत्याने प्रतिक्रिया दिल्यावर त्यावर बोलणं हा प्रघात आहे. पण त्यावर लगेच गुन्हा दाखल करा आणि अटक…? ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे ते पेंडिग आहेत. संजय राठोडचं काय झालं? कुठे अडलं? राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर बलात्काराचा आरोप आहे त्याचं काय झालं?, असे सवालही त्यांनी केले.

बॉल आपटला तर उसळी मारतोच

राणेंना तुम्ही प्रशासनिक समज देऊ शकता. पण सध्या सुडबुद्धीने सगळं सुरू आहे. त्यांच्या रॅलीला कोकणात जो प्रतिसाद मिळतो, त्याला रोखण्याचा हा प्रकार आहे. पण बॉल आपटला तर तो उसळी मारून वर येतोच, असा इशाराही त्यांनी दिला.

राणेंच्या वाक्याचं समर्थन नाही

गेल्या 20 महिन्यात जे सुडबुद्धीने सुरू आहे. त्याची यादी करत आहे. ते कशात बसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय जीवन सुसंस्कृत होतं. त्यावर काय चालू आहे. राज्यातील सर्व पक्षाच्या प्रमुखांनी एकत्रं बसून चर्चा केली पाहिजे, असं सांगतानाच मी राणेंच्या वाक्याचं समर्थन करत नाही. पण त्यांची शैली आहे. कोकणात ज्या पद्धतीने बोललं जातं तो अनादर नसतो, असं ते म्हणाले.

नीलम गोऱ्हे कोणत्या कॅपेसिटीतून बोलत आहेत?

विनायक राऊत या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत. नीलम गोऱ्हे कोणत्या कॅपेसिटीतून बोलत आहेत? विधान परिषदेच्या उपसभापतींना पक्ष नसतो. गेल्या दोन चार महिन्यातील त्यांचे आर्टिकल्स आम्ही काढून कोर्टात जाणार आहोत. हे स्थान हे पक्षविरहीत असताना त्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्या कशा बोलू शकतात, असंही ते म्हणाले. (bjp leader chandrakant patil slams cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

Narayan Rane : मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

“कोंबडी चोर !!!” नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा संताप, दादरमध्ये डिवचणारे पोस्टर

(bjp leader chandrakant patil slams cm uddhav thackeray)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.