तुम्ही आणलेलं विधेयक अर्धवट, 50 टक्क्यांची मर्यादा हटवा; राऊतांची राज्यसभेत जोरदार मागणी

102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. (sanjay raut)

तुम्ही आणलेलं विधेयक अर्धवट, 50 टक्क्यांची मर्यादा हटवा; राऊतांची राज्यसभेत जोरदार मागणी
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 3:30 PM

नवी दिल्ली: 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असं सांगतानाच आम्ही सामाजिक न्यायाची आस घेऊन आलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. (central govt should amendment to extend 50 percent limitation of reservation, says sanjay raut)

आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग केली. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.

संभाजीराजेंचीही तीच भावना

खासगदार संभाजी छत्रपती या सभागृहात बसले आहेत. ते या आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर जावी ही त्यांचीही भावना, त्यामुळे सरकारने सर्वांच्याच भावानांचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

मराठा राजाने आरक्षण दिलं, आज मराठा तरुण लढतोय

महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आमच्या हातात राष्ट्राच्या संरक्षणासाठी नेहमी तलवार किंवा बंदूक राहिली आहे. हा आमचा धंदा राहिला आहे. आमच्या हातात कधी तागडी तराजू आलं नाही. चोपडीही आली नाही. आम्ही तर लढत राहिलो. त्यामुळे सामाजिक न्यायाची आस ठेवून आम्ही आलो आहोत. हा सोशल जस्टिसचा विषय आहे. हा पॉलिटिकल इंजिनीयरिंगचा प्रश्न नाही. शाहू महाराजांनी सर्वात पहिलं आरक्षण दिलं. सामाजिक न्यायासाठी 119 वर्षापूर्वी त्यांनी आरक्षण दिलं. 50 टक्के आरक्षण दिलं. आरक्षण देणारा राजा महाराष्ट्राचा होता. मराठा होता. आज मराठा समाज रस्त्यावरून आंदोलन करत आहे. हे या देशाचं दुर्देव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आरक्षणाचा हा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली. (central govt should amendment to extend 50 percent limitation of reservation, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

विरोधकांचा राज्यसभेत गदारोळ, टेबलावर चढले खासदार, गोंधळ पाहून व्यंकय्या नायडू भावूक

संसदेने कायदा करुनही 50 टक्क्यांच्यावरती आरक्षण देता येणार नाही, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी टेक्निकल मुद्दा सांगितला!

आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या दानवेंचं तोंड बंद का होतं?; विनायक राऊत बरसले

(central govt should amendment to extend 50 percent limitation of reservation, says sanjay raut)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.