पवारांच्या ड्राव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यापालांना देणे कोणत्या नैतिकतेत बसते?; दादांविरुद्ध दादा, हल्लाबोल सुरूच

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. (Chandrakant Patil slams Ajit Pawar )

पवारांच्या ड्राव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यापालांना देणे कोणत्या नैतिकतेत बसते?; दादांविरुद्ध दादा, हल्लाबोल सुरूच
chandrakant patil
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 8:00 PM

पुणे: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यामुळे राज्यात दादा विरुद्ध दादा असा वाद पाहायला मिळत असून चंद्रकांतदादांनी पुन्हा एकदा अजितदादांवर टीका करून या वादाला फोडणी दिली आहे. (Chandrakant Patil slams Ajit Pawar)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना अजित पवारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय 14 महिने जुना आहे, हा विषय आता का काढता? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्याविषयी चंद्रकांतदादांना छेडण्यात आले. त्यावर त्यांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतलं. महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे, असं सांगतानाच 14 महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा सवाल पाटील यांनी केला.

अजितदादांचे विधान दांभिकपणाचे

आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी टीका केली. अजित पवारांच्या वाक्यात दांभिकपणा आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केस नीट चालवली नाही, असं मराठा समाज म्हणत आहे. सरकारने सारख्या तारखा मागितल्या. त्यामुळे कायद्याला स्टे आला. आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असं आम्ही सांगत आहोत. पण सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. आता आयोग नेमलाय. त्याला स्टाफ आणि बळ पुरवा, असा टोला त्यांनी लगावला.

संभाजीराजेंच्या आंदोलनात सहभागी होऊ

खासदार संभाजी छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी 16 तारखेला कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या घोषणेचे आपण स्वागत करतो. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा देण्याची भाजपाची भूमिका आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनातही भाजपा सहभागी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

4 हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी 1 हजार

आपल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात 4 हजार रिक्षाचालकांना प्रत्येकी 1 हजार रुपयांची सीएनजी कुपन देण्यात येणार आहेत. जेणेकरून लॉकडाऊन उठल्यानंतर 15 दिवस रिक्षाचालकांना इंधनाचा खर्च करावा लागणार नाही. मतदारसंघातील काही हजार मुलींना नवे ड्रेस शिऊन देण्यात येतील. तसेच 1200 जणांना कोरोनाची लस खासगी रुग्णालयात देण्यासाठी त्यांचे पैसे कार्यकर्त्यांमार्फत भरण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. (Chandrakant Patil slams Ajit Pawar)

संबंधित बातमी:

आरक्षणासाठी पवारांच्या पाठीही उभे राहू, संभाजीराजे तर आमचे राजे आहेत: चंद्रकांत पाटील

आमचा लढा सरकारविरोधात नाही, न्याय हक्कासाठी आहे; आमची चळवळ अराजकीय: संभाजी छत्रपती

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

(Chandrakant Patil slams Ajit Pawar)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.