कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?; संध्याकाळी आमदारांची बैठक; पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप होणार?

पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. (CM Amarinder Singh To Resign; Top Brass Rush To State)

कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?; संध्याकाळी आमदारांची बैठक; पंजाब काँग्रेसमध्ये भूकंप होणार?
Amarinder Singh
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 3:32 PM

चंदीगड: पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. या बैठकीला अमरिंदर सिंग जाणार नसून ते बैठकीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (CM Amarinder Singh To Resign; Top Brass Rush To State)

आज संध्याकाळी 5 वाजता चंदीगडच्या काँग्रेस भवनमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला दिल्लीतून हरीश रावत, अजय माकन आणि हरीश चौधरी आज संध्याकाळी चंदीगडला पोहोचणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माकन आणि चौधरी यांनी निरीक्षक म्हणून नियुक्त केलं आहे.

हिंदू नेत्याकडे सूत्रे

दरम्यान, आज होणाऱ्या विधीमंडळ नेत्यांच्या बैठकीत पक्षातील हिंदू नेत्याची विधीमंडळ नेतेपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यात सुनील जाखड आणि विजय इंद्र सिंगला यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. तर नवज्योतसिंग सिद्धूही विधीमंडळ नेतेपदाच्या शर्यतीत असल्याचं सांगितलं जात आहे.

सोनिया गांधीना फोन, बैठकीवर नाराजी

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरिंदर सिंग यांनी आज सोनिया गांधींना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांना विश्वासात न घेता आमदारांची बैठक बोलावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला असं अडगळीत टाकणार असतील तर मुख्यमंत्रीपदी राहण्यास आपण इच्छूक नाही, असं सिंग यांनी सोनिया गांधींना फोन करून सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

अविश्वास प्रस्ताव आणणार?

दरम्यान, हे 40 बंडखोर आमदार अमरिंदर सिंग यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

नेमका वाद काय?

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या 25 आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला. (CM Amarinder Singh To Resign; Top Brass Rush To State)

संबंधित बातम्या:

भाजपने 6 महिन्यात 5 मुख्यमंत्री बदलले, काँग्रेसला एक जमेना? पंजाबमध्ये पुन्हा ‘कॅप्टन’ पंगा, वाचा काय घडतंय?

नवज्योतसिंग सिद्धू उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी नकोच: मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू, पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान, नेमका वाद काय?

(CM Amarinder Singh To Resign; Top Brass Rush To State)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.