AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?; पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांचा सवाल

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. (sanjay raut)

प्रत्येक भेटीत राजकारण का काढता?; पवार-मोदी भेटीवर संजय राऊतांचा सवाल
sanjay raut
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 4:25 PM
Share

नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. (i don’t think any politics in pm modi and sharad pawar meeting, says sanjay raut)

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला. पवार-मोदींची राजकीय भेट आहे, असं मला वाटत नाही. या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल. पवार हे देशाचे प्रमुख नेते आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? पवार हे मोदींना भेटत असतात. प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही, असं त्यांनी सांगितलं.

सरकारमधील लोकच टार्गेट

सहकारी कारखान्यावर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. सरकारमधील सहभागी लोकांना टार्गेट केल जात आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई झाल्याचं मी माध्यमातून वाचत आहे, असं ते म्हणाले. पंकजा  मुंडेंच्या कारखाण्यावर  कारवाई झाली , मी माध्यमातून वाचतोय

त्या भेटीबाबत माहीत नाही

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यावर राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर मला त्याविषयी माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.

त्यांचा रागरंग पाहू

आज राज्यसभेची सर्वपक्षीय बैठक आहे. त्यांचा काय रागरंग आहे, तो पाहू. मग राज्यसभेतील भूमिका ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यसभेच्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार येणार आहेत. तेव्हा त्यांना भेटेन. त्यांच्याशी चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं. (i don’t think any politics in pm modi and sharad pawar meeting, says sanjay raut)

संबंधित बातम्या:

उद्धव-मोदींच्या भेटीनं महाराष्ट्रातलं सरकार ‘अस्थिर’ झालं, आता पवार-मोदींच्या भेटीनं काय होईल?; वाचा सविस्तर

मागच्या भेटीत जेव्हा शरद पवार मोदींना भेटले त्यावेळेस काय झालं होतं? आताही तशीच ‘ऑफर’ असेल?; वाचा सविस्तर

आधी भुजबळ फडणवीस भेटले, नंतर पवार मोदी भेटले, भेटीगाठीनं शिवसेना चेकमेट?

(i don’t think any politics in pm modi and sharad pawar meeting, says sanjay raut)

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.