विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?

विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसे नेते गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (know about mns navi mumbai leader gajanan kale)

विवाहबाह्य संबंध, बायकोला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले गजानन काळे नेमके कोण आहेत?
gajanan kale
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 11:37 AM

नवी मुंबई: विवाहबाह्य संबंध आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसे नेते गजानन काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी चळवळ ते मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्षपर्यंतची त्यांनी मजल मारली आहे. अभ्यासू नेता आणि चळवळ्या कार्यकर्ता असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, पत्नीनेच तक्रार केल्याने आता ते अडचणीत आले आहेत. (know about mns navi mumbai leader gajanan kale)

तक्रार काय?

गजानन काळे यांचे अनेक महिलांशी संबंध होते. 2018 मध्ये एका महिला टीव्ही पत्रकारासोबत त्याचं अफेयर्स सुरु होतं. मी गजाननच्या मोबाईलमध्ये दोघांचे मेसेज पाहिले होते… त्यांना दोघांना एकत्र फिरताना, हॉटेलमध्ये जेवताना पाहिलं. त्यानंतर पुन्हा 2021 मध्ये त्याचे एका महिला पत्रकारासोबत अनैतिक संबंध सुरु झाले. याबद्दल मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला मात्र, मी राजकारणी आहे, मला कुणी काही करु शकत नाही.. मला तू आणि मुलगा यांच्यापासून स्पेस हवी आहे…. तुझी आणि मुलाची मी यापुढे जबाबदारी घेणार नाही, असं म्हणत सातत्याने त्याने मला त्रास दिलाय”, असं त्यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.

2008 मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झालं. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात. तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही… तुझ्या वडिलांची पोस्ट (हुद्दा) बघून मी तुझ्याशी लग्न केलं, असेही गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.

विद्यार्थी संघटनेतील कार्यकर्ता

गजानन काळे हे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी संघटनेत ते कार्यरत होते. भारतीय छात्र भारती या विद्यार्थी संघटनेतून त्यांच्या राजकीय कार्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलने केली. फि वाढीविरोधातील आंदोलन असो, प्रवेश प्रक्रियेतील घोळ, निकाल लागण्यात होणारी दिरंगाई असो की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो. प्रत्येक आघाडीवर काळे यांनी जोरदार आंदोलने केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी कधी विद्यापीठाच्या गेटवर तर कधी आझाद मैदानात त्यांनी आंदोलने केली. तर कधी महाविद्यालयांमध्ये घुसून महाविद्यालयांमधील मनमानी कारभारा विरोधातही आंदोलने केली.

मनसेत प्रवेश

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांचा आक्रमक स्वभाव आणि भाषणशैलीवर प्रभावीत होऊन अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. त्यात गजानन काळे यांचाही समावेश होता. त्यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेत आल्यानंतर त्यांनी कामाचा धडका लावला. गणेश नाईक यांचं नवी मुंबईवर अधिराज्य आहे. त्यातच शिवसेनाही बलवान आहे. ही सर्व आव्हाने असताना काळे यांनी नवी मुंबईत मनसेचं संघटन मजबूत करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

औरंगाबाद संपर्क प्रमुख ते विधानसभेचं मैदान

काळे यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरे यांची मनसेच्या औरंगाबाद संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली. औरंगाबादमधील त्यांच्या कामाचं कौतुकही केलं. काळे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातून 2019 निवडणूक लढवली. त्यात त्यांना अपयश आलं. पण त्यांनी चांगली मते घेतल्याने चर्चेत आले होते. (know about mns navi mumbai leader gajanan kale)

संबंधित बातम्या:

अनेक स्त्रियांशी संबंध, जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण, मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

गजानन काळे यांच्याविरोधात गंभीर आरोप करत पत्नीकडूनच गुन्हा दाखल, मनसेत खळबळ

खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडोज आणता ही कसली मर्दानगी?; संजय राऊत भडकले

(know about mns navi mumbai leader gajanan kale)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.