मुख्य निवडणुका होण्याआधीच इम्पिरीकल डेटा पूर्ण करा, नव्या मंत्र्यांकडून ओबीसींच्या खूप अपेक्षा: पंकजा मुंडे
बीसींच्या आरक्षणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्य निवडणुका होण्याआधीच ओबीसींचा डेटा पूर्ण करा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. (pankaja munde)
मुंबई: ओबीसींच्या आरक्षणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्य निवडणुका होण्याआधीच ओबीसींचा डेटा पूर्ण करा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. तसेच ओबसी आरक्षणाबाबत नव्या मंत्र्यांकडून ओबीसी समाजाच्या खूप अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (maharashtra government should collect empirical data befor upcoming election, says pankaja munde)
पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ओबीसींचं आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. तो ओबीसींवर घोर अन्याय होईल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने तात्काळ पावलं उचलून हे थांबवणं आवश्यक आहे. या पोटनिवडणुका आहेत. मुख्य निवडणुकांच्या आधी तरी सरकारचा इम्पिरीकल डेटा आणि त्याचा अभ्यास होणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे, असं पंकजा म्हणाल्या.
केंद्र सरकार पिक्चरमध्ये नाही
ओबीसींच्या आरक्षणप्रश्नी केंद्र सरकार अजून पिक्चरमध्ये नाहीये. कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्राकडे काही अपेक्षा असतील तर आपल्याकडे हक्काचे चार मंत्री आले आहेत. ओबीसी आरक्षणाबाबत काहीही मदत लागली तर केंद्रातील नव्या मंत्र्यांनी सहकार्य करावं. महाराष्ट्रातून जे मंत्री झाले आहेत. त्यांच्याकडून ओबीसींच्या अनेक अपेक्षा आहेत, असंही त्या म्हणाल्या.
आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये
प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. म्हणून नाराज होण्याचं कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझं घर वाहून गेलं नाही. मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाहीये. मग माझं पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचं पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन शब्द मला मान्य नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
प्रीतम यांचं नाव चर्चेत ते योग्यच
भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम यांचंच नाही तर हिना गावित यांचं नावही चर्चेत होतं. पण नवीन लोकांनना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे, असं सांगतानाच प्रीतम ताईंचं नाव चर्चेत होतं आणि योग्य होतं. पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (maharashtra government should collect empirical data befor upcoming election, says pankaja munde)
संबंधित बातम्या:
(maharashtra government should collect empirical data befor upcoming election, says pankaja munde)