क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर अखेर कॅप्टन यांना पायउतार व्हावं लागलं आहे. (Navjot Singh Sidhu Punjab Congress President Ex Cricketer how turn to Politician journey)

क्रिकेट असो की राजकारण... 'कॅप्टन'विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग 'क्लीन बोल्ड'
navjot singh sidhu
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 6:13 PM

चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर अखेर कॅप्टन यांना पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे क्रिकेट असो वा राजकारण सिद्धू यांचं कॅप्टन विरोधात कायम बंड राहिल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. (Navjot Singh Sidhu Punjab Congress President Ex Cricketer how turn to Politician journey)

पुढील वर्षी पंजाबच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परंतु सिद्धू यांनी आतापासूनच धुवाँधार बॅटिंग सुरू करायला सुरुवात केली आहे. क्रिकेटच्या मैदानावर सिद्धूंनी जशी फटकेबाजी केली, तशीच फटकेबाजी ते राजकीय मैदानावर करत आहेत. सिद्धूंची खासियत म्हणजे ते धक्कातंत्रात वाकबगार आहेत. काँग्रेसमध्ये आल्यानंतर अमरिंदर सिंग मंत्रिमंडळात गेले. मात्र काही काळानंतर त्यांना वनवासात राहावं लागलं. पण वनवासात गेल्यानंतर शांत बसतील ते सिद्धू कसले? या काळात अमरिंदर सिंग यांना कशी मात द्यायची याचा विचार केला. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय झाले आणि सिद्धू यांनी अशी काही खेळी खेळली की आज अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पायउतार व्हावे लागले.

2004मध्ये सिद्धू राजकारणात आले होते. भाजपमधून त्यांनी राजकारणाचा श्रीगणेशा केला. दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूंना भाजपमध्ये आणलं होतं. ते तीन वेळा अमृतसर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2014मध्ये त्यांना जेटलींसाठी आपली सीट सोडावी लागली होती. मात्र, असं असलं तरी सिद्धूंसाठी जेटली हे त्यांचे कायम राजकीय गुरु राहिले आहेत.

तिकीट कापलं अन् भाजप सोडली

2014मध्ये सिद्धूंना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. परंतु, सिद्धूंना ते काही आवडलं नाही. त्यांनी 2017मध्ये राज्यसभेचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच वर्षी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी त्यांना अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलं. मात्र अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी 2019मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

पंजाबातील दिग्गजांना सोबत घेतलं

काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर सिद्धूंनी पंजाबमध्ये उचल खाल्ली. त्यांनी सुरुवातीला अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंड पुकारलं. पंजाबचा प्रदेशाध्यक्ष बदलावा म्हणून त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना आपल्या बाजूला केलं. यात कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा, सुखबिंदर सिंह सरकारिया, सुखजिंदर सिंह रंधावा आदी नेत्यांना आपल्या कळपात सामिल केलं. परगट सिंग, कुलबीर जीरा आदी आमदारांनाही त्यांनी आपल्याकडे खेचून आणलं.

थेट हायकमांडशी चर्चा

अमरिंदर सिंग यांच्या विरोधानंतरही सिद्धू यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. सिद्धूंच्या या बंडाला काही प्रमाणात काँग्रेस हायकमांडनेही बळ दिलं. सिद्धू हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या निकटवर्तीय मानले जातात. अमरिंदर सिंग यांच्याशी काहीही वाद झाला की ते थेट प्रियंका गांधींना जाऊन भेटतात.

सिद्धूंना पक्षातूनच बळ

पंजाबच्या मतदारांचा कल समजून घेण्यासाठी काँग्रेसने एक सर्व्हे केला होता. त्यामुळेच काँग्रेसने सिद्धूंकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे दिली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांची काही निर्णय वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांची ही नाराजी दूर करण्यासाठीही काँग्रेसने सिद्धूंना बळ दिलं. जनतेच्या मनातील प्रश्नच सिद्धू विचारत होते. जनतेच्या मनातील काँग्रेसविरोधीतील लाट कमी करण्यासाठीच काँग्रेसने सिद्धूंना पुढे केल्याचंही सांगितलं जात आहे.

क्रिकेटमध्येही कॅप्टनशी भिडले

राजकारणच नव्हे तर क्रिकेटमध्येही सिद्धूंचं कॅप्टनशी कधी पटलं नाही. 1996मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वातील टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती. मात्र, या दौऱ्यातून सिद्धू अचानक भारतात परतले. कुणाला काहीही न सांगता सिद्धू भारतात आले. त्यामुळे बीसीसीआयने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीत मोहिंद अमरनाथही होते. अझहरुद्दीन नेहमी सिद्धूंना आईवरून काही तरी टोमणे मारायचे. त्यामुळे नाराज होऊन सिद्धू भारतात परतले होते, असं अमरनाथ यांनी सांगितलं. पण ती शिवी नव्हती, असंही त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अझहर जो शब्द वापरत होते. तो शब्द हैदराबादमध्ये आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम दाखवण्यासाठी वापरला जातो. ही माहिती मिळाल्यानंतर सिद्धू आणि अझहरमधील दुरावा कमी झाला आणि त्यांची चांगली मैत्रीही झाली होती. (Navjot Singh Sidhu Punjab Congress President Ex Cricketer how turn to Politician journey)

संबंधित बातम्या:

Amrindar Singh Resigns : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा! आता पुढचं पाऊल काय?

नवज्योतसिंग सिद्धूंसह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी चौघे?; वाचा, ‘कॅप्टन’च्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये काय होणार?

सरकार 5 वर्षे टिकणार हे तुम्हाला सातत्याने बोलावं का लागतं? आशिष शेलारांचा राऊतांचा खोचक सवाल

(Navjot Singh Sidhu Punjab Congress President Ex Cricketer how turn to Politician journey)

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.