पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची खोचक टीका

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनीही पटोलेंवर टीका केली आहे. (nilesh rane)

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची खोचक टीका
निलेश राणे, माजी खासदार
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 4:13 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अनुल्लेखाने मारल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. त्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनीही पटोलेंवर टीका केली आहे. पवार साहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला आहे, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे. (nilesh rane reaction on sharad pawar comments to nana patole)

निलेश राणे यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. अरे रे रे… पवार साहेब कधी कधी वाटतं तुम्ही काही लोकांची लायकी खूप चांगली ओळखता. नाना पटोले आता कुठे स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत बघू लागले होते. तेवढ्यात पवार साहेबांनी त्यांना पान टपरीवालाचं करून टाकला, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

काय म्हणाले होते पवार?

शरद पवार यांनी बारामतीत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत पाठित सुरा खुपसला जात आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. त्याबद्दल तुमचं काय मत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी पटोले यांना थेट त्यांची जागाच दाखवली. या गोष्टीत मी काही पडत नाहीत. पटोलेंसारखी माणसं लहान आहेत. लहान माणसांवर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं, असं पवार म्हणाले. पवारांच्या या खोचक टीकेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पटोलेंचं ‘ते’ विधान

पटोले लोणावळ्यात होते. एका मेळाव्याला संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच आपण काहीच बोलायचं नाही. पण तो त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो. यावर माघार घेणार नाही. त्यामुळे कामाला लागा, असं पटोले म्हणाले होते. (nilesh rane reaction on sharad pawar comments to nana patole)

संबंधित बातम्या:

नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू?; शरद पवारांनी फटकारले

कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पंकजा मुंडेंच्याविरोधात जाऊ शकतं का?; वाचा सविस्तर

कोकणात शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे ‘मनोमिलन’; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ

(nilesh rane reaction on sharad pawar comments to nana patole)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.