मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?; राऊतांचा सवाल
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे. (sanjay raut)
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चर्चेतील हवाच काढून टाकली आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे. (No alliance with BJP in future, says sanjay raut)
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. काही केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केली. अशा विचारधारेचा हा पक्ष आहे. ते लोक शिवसेनेला दुश्मन मानतात, त्यांच्याशी युती कशी होणार?, असा सवाल करतानाच युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. आमचं चांगलं चाललंय. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपलं, असं राऊत म्हणाले.
शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही
पाच वर्ष सरकार चालवण्याची कमिटमेंट आहे. शिवसेना नेहमी कमिटमेंट पाळणारी आहे. शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही. दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. खासकरून ठाकरे कुटुंबाची. आम्ही त्याच मार्गाने जात असतो. त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल, या भ्रमात कुणी राहू नये. कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसवावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बरेच लोक आमच्याकडे येऊ इच्छितात
मुख्यमंत्र्यांनी काल भाषण केलं. ठाकरेंची स्वत:ची स्टाईल आहे. त्या स्टाईलमध्ये ते बोलले. नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल आणि आम्ही या सरकारमधून बाहेर पडू असं त्यांनी कुठेच म्हटलेलं नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, ज्यांना आमचे भावी सहकारी व्हायचं आहे, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातील काही लोकांकडे त्यांनी बोट दाखवून आणि नाव घेऊन त्यांनी विधान केलं. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत… विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी मला माजी म्हणू नका म्हणून सांगितलं त्या त्या बाबतच्याच हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहे. कुणी तरी आहे तिथे, त्यांना इथे यायचे आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरेंनी संकेत दिले. तुम्ही या. बरेच लोकं येऊ इच्छित आहेत. येतीलच आता. चंद्रकांतदादाच म्हणाले 72 तास थांबा म्हणून. काही लोकांनी लगेच पतंग उडवण्यास सुरुवात केली. उडवू द्या. पतंगवर जाते आणि कापली जाते. येईल नंतर खाली, असा चिमटा राऊत यांनी काढला.
स्थानिक पातळीवर भाजपशी युती नाही
विधानसभेत आम्ही एकत्र आहोत. लोकल लेव्हला भाजपसोबत जाणं ही लोकांशी गद्दारी ठरेल. औरंगाबादमध्ये धर्मांध शक्ती थोपवायला आम्ही तिघे समर्थ आहोत. तसं नसतं तर दोन वर्ष सरकार सुरळीत चाललं नसतं. तिन्ही पक्षात सर्वकाही अलबेल आहे. कुणाच्या मनात किंतू परंतु नाही. या सरकारला नोव्हेंबरमध्ये दोन वर्ष होत आहे. पुढील तीन वर्ष सुद्धा अधिक गतिमान पद्धतीने हे सरकार चालेल. याबद्दल विरोधी पक्षांनी खात्री बाळगावी, असं सांगतानाच. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू देऊ असं काही लोकांना वाटत आहे. हा कचरा कुणाच्या डोक्यात असेल तर तो तसाच ठेवा आम्ही झुकणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (No alliance with BJP in future, says sanjay raut)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा, अजितदादांच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्या
Maharashtra News LIVE Update | महाराष्ट्रातील टॉपच्या घडामोडी
(No alliance with BJP in future, says sanjay raut)