लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं पवारांना टॉप सिक्रेट!

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती.

लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते?; प्रशांत किशोर यांनी सांगितलं पवारांना टॉप सिक्रेट!
Prashant Kishor
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 11:28 AM

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. ही अत्यंत सिक्रेट मिटींग होती. या बैठकीत भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यासह भाजपला मात देण्यासाठीच्या व्यूहरचनेवरही चर्चा झाली. एवढेच नव्हे तर भाजपला मात कशी देता येईल?, भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल? भाजपविरोधात उभे ठाकण्याचा समान धागा काय असू शकतो, याचं सादरीकरणच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Prashant Kishor Meets Sharad Pawar in mumbai, fuels talks Of anti-BJP front)

या अत्यंत महत्त्वाच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं दाखवून दिलं आहे. त्या जागा कोणत्या, कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे. तसेच एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असंही त्यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. देशपातळीवर भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असेल तसे न घडल्यास राज्य पातळीवर विरोधकांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला काय असावा याची माहितीही त्यांनी पवारांना दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

प्रादेशिक पक्षांशी संवाद साधा

प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी पवारांनाही प्रादेशिक पक्षांशी संवाद साधून त्यांना एकत्रित आणण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या वेळी बंगालच्या राजकारणावरही चर्चा झाली. मोदींची लाट असताना आणि भाजप बंगालमध्ये वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेला असतानाही ममता बॅनर्जी यांनी विजय कसा खेचून आणला, त्यासाठी काय रणनीती वापरली याची माहितीही त्यांनी पवारांना दिली आहे.

आघाडीवर जोर

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच पवार-प्रशांत किशोर यांची भेट होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भेट झाली नाही. मात्र, काल झालेल्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. परंतु, भाजपविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोठी आघाडी निर्माण व्हावी यावर या भेटीत अधिक जोर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Prashant Kishor Meets Sharad Pawar in mumbai, fuels talks Of anti-BJP front)

संबंधित बातम्या:

Special Story: पवारांना प्रशांत किशोर भेटले, मोदींना उद्धव, कोण कुणीकडे कशासाठी का जातंय? समजून घ्या 10 पॉईंट्समधून!

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

पवार-प्रशांत किशोर भेटीत ‘मविआ’ आणि ‘बंगाल मॉडेल’वर चर्चा?; जयंत पाटील ‘सिल्व्हर ओक’वर तातडीने दाखल

(Prashant Kishor Meets Sharad Pawar in mumbai, fuels talks Of anti-BJP front)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.