सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. (sanjay raut)

सरकार वाचवण्यासाठी हालचाली, संजय राऊत यांची गुप्त बैठक, कोण कोण उपस्थित?
sanjay raut
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 7:55 PM

मुंबई: महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. (secret meeting between shiv sena and ncp leaders in mumbai)

काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दिलेला नारा, आघाडीच्या नेत्यांच्या सुरू असलेल्या चौकश्या, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयामुळे सरकारची झालेली कोंडी आदी पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ही गुप्त बैठक झाल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीला केवळ शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मोजकेच नेते उपस्थित होते. या बैठकीचं ठिकाण अत्यंत गुप्त ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या बैठकीची कुणालाही माहिती नव्हती. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असून पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

‘स्वबळा’मुळे चलबिचल?

काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातत्याने काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढेल अशी वक्तव्ये केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल असल्याचं दिसतं. त्यातच संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. याशिवाय दोन दिवसापूर्वी शरद पवार स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेले होते.

काँग्रेसला वगळलं, कोणती खिचडी शिजतेय?

विशेष म्हणजे या गुप्त बैठकीला काँग्रेसचा एकही नेता नव्हता. आधीपासूनच सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने वर्चस्व ठेवलं आहे. अनेक महत्त्वाच्या निर्णयातून काँग्रेसला डावललं आहे. त्यात आता या बैठकीपासूनही काँग्रेसला दूर ठेवल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नेमकी काय खिचडी शिजतेय? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडी करूनच लढण्याची चर्चा या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ शकतं. राज्य सरकारला दगाफटका करण्याचं काम होऊ शकतं, त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. (secret meeting between shiv sena and ncp leaders in mumbai)

संबंधित बातम्या:

शिवसेनेकडील खनिकर्म महामंडळाच्या निविदा प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

VIDEO: ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची ‘तुंबळ लढाई’ सुरु? राऊतांना दिल्लीत का ‘महाभारत’ आठवतंय?; वाचा सविस्तर

मुख्यमंत्रीपदी प्रमोशन मिळावं असं वाटत नाही का? असं विचारताच अजितदादा म्हणाले…

(secret meeting between shiv sena and ncp leaders in mumbai)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.