Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर

स्थानिक पातळीवरील निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर
sharad pawar
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 3:05 PM

मुंबई: स्थानिक पातळीवरील निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढताना दिसत आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच मोठं विधान केलं आहे. पवारांनी विधानसभा आणि लोकसभेतही आघाडी एकत्र राहण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपसमोरची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (sharad pawar hints shiv sena, ncp and congress alliance in lok sabha and assembly election)

राष्ट्रवादीचा आज 22 वर्धापन दिन सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पक्षाची वाटचाल आणि भविष्यातील दिशा यावरही त्यांनी नेमकेपणानं भाष्य केलं. त्याचवेळी शरद पवारांनी दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकीत आघाडी टिकून राहणार असल्याचं मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

पवार नेमकं काय म्हणाले?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. त्या दिवसापासून हे सरकार टिकण्याबाबत सतत चर्चा होत होती. किती दिवस? किती आठवडे? किती महिने?, एखादं वर्ष हे सरकार टिकेल, अशी चर्चा होत होती. पण आता ती चर्चा होत नाही. काल-परवा थोडीबहुत चर्चा झाली. पण मला त्याची चिंता वाटत नाही. राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटलं. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेते स्वतंत्र बसले. काही चर्चा विचारविनियम केला. कुणी काही करो, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका वावड्या उठवल्या गेल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शिवसेना आली आहे. सेनेसोबत कधी काम केलं नाही. महाराष्ट्र अनेक वर्षापासून सेनेला पाहतो आहे. त्यानुसार सेना विश्वास असणारा पक्ष आहे. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना भूमिका सोडणार नाही. कुणी असं काही मांडत असेल तर ते वेगळ्या नंदन वनात राहत आहेत, असं म्हणावे लागेल, असं सांगतानाच हे सरकार पाच वर्षे टिकेल. नुसतंच पाच वर्षे टिकणार नाही तर उद्याच्या लोकसभा- विधानसभेला हे सरकार जोमानं काम करेल. या बद्दल माझ्या मनात शंका नाही, असं पवारांनी सांगितलं. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

एकाच दगडात अनेक पक्षी

शरद पवार यांच्या आजच्या भाषणाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांनी आजच्या भाषणातून एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. त्यामुळे पवारांचं आजचं भाषण चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. एक तर मोदी-ठाकरे वैयक्तिक भेटीची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. त्यानंतर भेटीमुळे दोन्ही पक्ष जवळ येणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं आहे. तसेच या चर्चेला पूर्णविरामही दिला आहे. दुसरं म्हणजे शिवसेना हा सर्वात विश्वास असणारा पक्ष असल्याचं सांगून भाजपकडून झालेल्या फसवणुकीची शिवसेनेला अप्रत्यक्ष आठवणही करून दिली आहे. त्याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यातून आम्ही निवडणुकीत आघाडी करण्यास तयार असल्याची ऑफरच पवारांनी सेनेला दिली आहे. तसेच निवडणुकीत आघाडी करण्यावरून बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचीही कोंडी केली आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (sharad pawar hints shiv sena, ncp and congress alliance in lok sabha and assembly election)

संबंधित बातम्या:

कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही: अजित पवार

‘ते’ वेगळ्या नंदनवनात राहतात; आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी ठणकावले

Sharad Pawar | शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष,राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

(sharad pawar hints shiv sena, ncp and congress alliance in lok sabha and assembly election)

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.