पवारांचा दिल्लीतला एक दिवस, भेटायला मोदींना गेले, आल्यावर सेनेला गाडीत बसवलं, परत येताना काँग्रेसला गाडीत आणलं, वाचा काय झालं?
राजकारणात अनेक नेते एकाच दगडात दोन पक्षी मारत असतात. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच दगडात अनेक पक्षी मारत असतात. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. (Sharad Pawar)
नवी दिल्ली: राजकारणात अनेक नेते एकाच दगडात दोन पक्षी मारत असतात. परंतु, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार एकाच दगडात अनेक पक्षी मारत असतात. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. गेल्या दोन दिवसात त्याची प्रचिती राजकारण्यांना आल्याने पवार नीतीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Sharad Pawar- PM Modi meet triggers buzz, know pawar politics)
लोकसभेचं अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक होत असते. या बैठकीला जाताना शरद पवार शिवसेना नेते संजय राऊत यांना सोबत घेऊन गेले. दोघेही एकाच गाडीत बसून गप्पा मारत बैठकीला गेले. त्यानंतर बैठक संपल्यावर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत एकाच गाडीत बसून पवार निघून गेले. त्या आधी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन तासभर चर्चा केली होती. म्हणजे एका भेटीवर राजकीय चर्चा सुरू असतानाच दुसरी आणि त्यानंतर तिसरी राजकीय भेट घेऊन पवारांनी मूळ चर्चेवरून लक्ष विचलीत केलं आहे. त्यामुळे पवार नीती नेमकी काय आहे? त्यांचे राजकीय इशारे काय आहेत? याबाबत तर्कवितर्क लढले जात आहेत.
म्हणून पवारांची कसरत?
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. शिवसेना आणि काँग्रेस हे त्यांचे सत्तेतील मित्र पक्ष आहेत. पवारांच्या राजकारणाबाबत नेहमीच साशंकता घेतली जाते. त्यातच पवार आणि मोदी यांची भेट झाली. ही भेट केवळ मागण्यांचं निवेदन देण्यापुरती असती तर त्यावर चर्चा झाली नसती. पण ही भेट तब्बल तासभर चालली. त्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जात होते. पवारांना मोदींनी पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिलीय का? असा सवालही केला जात होता. त्यामुळेच पवारांनी या चर्चांचा धुरळा बसवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला जाताना शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांसोबत ये-जा करण्याची कसरत केली. त्यातून महाविकास आघाडी एकत्र आणि भक्कम असल्याचा संदेशही पवारांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भेटीनंतर पवार काय म्हणाले?
मोदी यांना भेटल्यानंतर झडत असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी पवारांनी ट्विट केलं होतं. शरद पवार यांनीच ट्विट करून या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं एक पत्रंही पोस्ट केलं आहे. बँकिंग अधिनियमामधील दुरुस्तीबाबतचं हे पत्रं होतं. त्यामुळे या भेटीत बँकिंग अधिनियमावरही चर्चा झाल्याचं स्पष्ट होत आहे. (Sharad Pawar- PM Modi meet triggers buzz, know pawar politics)
BREAKING : मुंबईत पावसाचा हाहाकार, चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 11 जणांचा मृत्यूhttps://t.co/Tz58aAi5l0 #Mumbai #MumbaiRains #Chembur #Landslides
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 18, 2021
संबंधित बातम्या:
केवळ राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवरच पंतप्रधानांशी चर्चा झाली; शरद पवार यांचा खुलासा
(Sharad Pawar- PM Modi meet triggers buzz, know pawar politics)