भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज; संजय राऊतांचा टोला

पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. (shiv sena leader sanjay raut slams bjp outsider leader)

भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज; संजय राऊतांचा टोला
sanjay raut
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 11:10 AM

मुंबई: पाकिस्तान आणि बांगलादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात. वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. (shiv sena leader sanjay raut slams bjp outsider leader)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. गेल्या दोन वर्षापासून अती झालं. महाराष्ट्रात आणि देशात बांगलादेशी घुसतात संपूर्ण देश खराब करतात. भाजपमधील घुसखोरांनी तसंच केलं आहे. भाजपच्या शुद्धीकरणाची गरज आहे. हा खूप मोठा पक्ष आहे. हिंदुत्वासाठी या पक्षाने मोठं काम केलं आहे. आम्ही 25 वर्षे त्यांच्यासोबत होतो. त्यांचं योगदान आम्ही जाणून आहे. पण ज्यांना हे माहीत नाही, जे बाहेरून आले आहेत, ते लोक शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत, असा हल्ला राऊत यांनी चढवला. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. देशासाठी बनलेला कायदा आहे. मग ती ईडी असो की सीबीआय असो. आम्ही जे आज लिहिलं. त्यात तथ्य आहे. आणि देशभरात त्यावर मंथन चालेल आणि चालणार, असं ते म्हणाले.

फडणवीस, पाटील, तावडे, शेलार कधीच बोलणार नाहीत

आता कोणी तरी बाहेरचा माणूस येतो शिवसेना भवनावर दगड मारू म्हणतो, कोणी मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारू म्हणतो. हे मूळ भाजपचा माणूस बोलणार नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे कधी बोलणार नाहीत. हे सगळे बाहेरून आलेले लोकं आहेत. महाराष्ट्रात, देशात बांगलादेशचे घुसखोर आणि पाकिस्तानचे घुसखोर हैदोस घालतात आणि आपण त्यांच्याविरोधात कारवाया करतो. महौल बिघडवतात. तसंच भाजपमध्ये बाहेरून आलेल्या लोकांनी माहौल बिघडवत आहेत, असं ते म्हणाले.

त्यांना इतिहासाचं पुस्तक द्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्य दिनाचा हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव समजून सांगण्यासाठी भाजपकडून पत्रं लिहिली जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अच्छा पत्रं लिहिणार आहेत. त्यांना लिहिता वाचताही येतं? चांगली गोष्ट आहे. आम्हाला स्वातंत्र्य संग्रामाबाबत सांगायची गरज नाही. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र दोन्ही राज्ये क्रांतीकारकांची भूमी आहे. मिस्टर नारायण राणे हे बंगालचा आणि महाराष्ट्राचा अवमान करत आहे. बंगाल आणि महाराष्ट्राच्या योगदानाची ज्या मंत्र्याला माहिती नाही, ते आम्हाला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व सांगत आहेत. त्यांनी आधी इतिहास वाचावा. भाजपने त्यांना इतिहासाचं पुस्तक द्यावं, असा टोला त्यांनी लगावला.

लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स

तुम्ही लेटर पॉलिटिक्स करा किंवा गटर पॉलिटिक्स करा. पण आमच्या सोबत सामना करणं अशक्य आहे. आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही करत राहा. ही तुमची वैफल्यग्रस्तता आहे. तुमचं नैराश्य असं काढू नका. तुम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी चांगलं आणि विधायक काम करा. अशा प्रकारची भाषा करू नका. राजकारणात आरोप प्रत्यारोप होतात. आम्ही सहन करतो. तुम्हीही सहन करा, असं त्यांनी सांगितलं.

वाद केवळ महाराष्ट्रात का?

राजकारणात केवळ वैचारिक मतभेद असतात. मिस्टर राणेंनी जे सुरू केलं. त्याला वैचारिक मतभेद म्हणत नाहीत. ते वैयक्तिक दुश्मनी काढत आहेत. कोणीही कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने व्यक्तिगत दुश्मनीसाठी काम करू नये. तुम्ही तुमचं विधायक काम करा. तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढत आहात. प्रत्येक राज्यात ही यात्रा सुरू आहे. कोणत्या राज्यात वाद झाले. केवळ महाराष्ट्रात का? याबाबत भाजच्या नेत्यांनी कधी विचार केला का? तुमच्यात एवढी गुर्मी असेल तर गाझीपूरमध्ये शेतकरी बसले आहेत. जाऊन त्यांच्यासोबत बोला, असा हल्ला त्यांनी चढवला.

आमच्याशी भाषेची बरोबरी करू नका

सभ्य भाषेत टीका असेल तर स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही स्वीकारली जाईल. तुम्ही कमरेखालची टीका केली तर याद राखा. कमरेखाली तुम्हीही आहात. आमच्याशी भाषेशी बरोबरी करू नका. आम्ही लिहिणारे बोलणारे आहोत आणि सर्वकाही करणारे आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

ते मोदींचे आदेश नाहीत

राजकारणात यात्रा काढल्या पाहिजेत. लोकांचा पाठिंबा मिळवायचा आहे. पण यांना यात्रेचा हेतू कळला नाही. सरकार काय काम करतं हे लोकांना सांगा यासाठी यात्रा काढा अशी मोदींची इच्छा आहे. यावेळी पार्लमेंट चाललं नाही. काही कारणांमुळे त्यामुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत गेल्या नाहीत. त्या लोकांना सांगा असं मोदींचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात जा, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करा, असे मोदींचे आदेश नाहीत, असा वारही त्यांनी केला. (shiv sena leader sanjay raut slams bjp outsider leader)

संबंधित बातम्या:

काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री, परब, आमदार दिलीप लांडेंविरोधात हायकोर्टात याचिका; आरोप काय?, वाचा सविस्तर

खासदार संभाजी छत्रपती सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

राजकीय पक्षात मतभेद असतात, पण… गिरीश बापटांचा नारायण राणेंना घरचा आहेर

(shiv sena leader sanjay raut slams bjp outsider leader)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.