सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबचे नवे ‘सरदार’, मुख्यमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब?; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर सुखजिंदर सिंग यांच्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Sukhjinder Randhawa to be Punjab Chief Minister)

सुखजिंदरसिंग रंधावा पंजाबचे नवे 'सरदार', मुख्यमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब?; थोड्याच वेळात अधिकृत घोषणा
Sukhjinder Randhawa
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 4:27 PM

चंदीगड: कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर सुखजिंदर सिंग यांच्याकडे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांच्यात झालेल्या तब्बल दोन तासाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच वेळात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. रंधावा यांचं नाव फायनल झाल्यानंतर ते राज्यपालांना भेटण्यासाठी रवाना झाले आहेत. (Sukhjinder Randhawa to be Punjab Chief Minister)

पंजाब काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदर सिंग यांचं नाव सोनिया गांधींकडे पाठवलं होतं. सोनिया गांधी आणि अंबिका सोनी यांच्यात दोन तास चर्चा झाल्यानंतर अखेर सुखजिंदर सिंग यांचं नाव फायनल झालं. त्यानंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांनी राज्यपालांशी चर्चाही केली आहे. त्यानंतर ते राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना भेटण्यास गेले.

दोन उपमुख्यमंत्री

पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. दलित समुदायातील चेहरा म्हणून अरुणा चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. तर हिंदू नेते म्हणून भारत भूषण आशू यांनाही उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे.

सुरक्षेत वाढ

नवे मुख्यमंत्री म्हणून रंधावा यांच्या नावाची घोषणा झाली नाही. मात्र, त्या आधाची त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झाल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय त्यांना भेटण्यासाठी आमदारांची रिघ लागल्यानेही तेच मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कोण आहेत रंधावा?

रंधावा हे नवज्योतसिंग रंधावा हे नवज्योतसिंग सिद्धू यांचे निकटवर्तीय समजले जातात. रंधावा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. ते 62 वर्षाचे आहेत. पंजाबच्या डेरा बाबा नानक मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. या मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहे. राज्य सरकारमध्ये सध्या ते कॅबिनेत मंत्री आहेत. त्यांच्याकडे सहकार आणि तुरुंग प्रशासन ही खाती आहेत.

गटबाजी रोखण्यासाठी निर्णय

सूत्रांच्या मते रंधावा यांचं नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी फायनल झालं आहे. फक्त आज त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रंधावा हे ज्येष्ठ नेते आहेत. सिद्धू यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतरही सिद्धू आणि अमरिंदर सिंग गटाच्या कुरघोडी सुरूच राहू शकतात. सिद्धू गटाने जाखड यांना विरोध केल्याने जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीद जाखड आणि सिद्धू गटातही तू तू मै मै होऊ शकते. त्यामुळेच रंधावा यांचं नाव फायनल केल्या गेल्याचं सांगितलं जात आहे. रंधावा यांना मुख्यमंत्रीद दिल्यास गटातटाच्या राजकारणाला तिलांजली दिली जाऊ शकते. तसेच दीड वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याचा काँग्रेसला फटका बसणार नाही, म्हणूनच रंधावा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी फायनल केल्याचंही सांगितलं जात आहे.

उद्या शपथविधी

दरम्यान, पंजाबमध्येही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे. रंधावा मुख्यमंत्री झाल्यास सिद्धू आणि दलित चेहरा म्हणून डॉय राजकुमार वेरका यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे. उद्या चंदीगडमध्ये छोटेखानी समारंभात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. (Sukhjinder Randhawa to be Punjab Chief Minister)

संबंधित बातम्या:

ना सिद्धू, ना जाखड, अंबिका सोनी यांचाही नकार… आता मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये सुखजिंदर रंधावा; सोनिया गांधींकडे खलबतं सुरू

मुख्यमंत्री करायचा तर माझ्याच गटाचा करा, नाही तर बहुमत चाचणीला तयार राहा; अमरिंदर सिंग यांनी थेट हायकमांडला ललकारले

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी अंबिका सोनीच!, सोनिया गांधींचं शिक्कामोर्तब; पण सोनी यांचा नकार

(Sukhjinder Randhawa to be Punjab Chief Minister)

Non Stop LIVE Update
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.