Thackeray and Pawar Meet | उद्धव ठाकरे ‘सिल्व्हर ओक’वर दाखल, मविआतील मतभेदांवर डॅमेज कंट्रोल होणार?

महाविकास आघाडीत गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीत मतभेद असल्याची माहिती समोर आली. या घडामोडींनंतर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती मिळत आहे.

Thackeray and Pawar Meet | उद्धव ठाकरे 'सिल्व्हर ओक'वर दाखल, मविआतील मतभेदांवर डॅमेज कंट्रोल होणार?
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:34 PM

मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटात सध्याच्या घडीला अतिशय मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींमध्ये महाविकास आघाडीत मतभेद असल्याची माहिती समोर आली. अनेक मुद्द्यांवर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात टोकाचे मतभेद बघायला मिळाले. असं असताना आता दोन्ही पक्षांच्या प्रमुखांकडून आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय. महाविकास आघाडीची वज्रमुठ घट्ट आहे ते दाखवून देण्यासाठी मित्र पक्षांचं एकमत असण्याची दाट आवश्यकता आहे. त्यामुळे आता दोन्ही बड्या नेत्यांकडून मतभेद दूर सारण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही पूर्वनियोजित भेट असल्याची माहिती मिळत आहे. कारण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची कालच भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेटीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. विशेष म्हणजे मोठ्या कालावधीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट होतेय. याआधी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर संभाषण झालं असेल. पण प्रत्यक्ष भेट अनेक दिवसांपासून झालेली नव्हती. त्यामुळे या दोन्ही बड्या नेत्यांच्या भेटीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरुन मतभेद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीची मागणी आणि निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर यावरुन महाविकास आघाडीत मतभेद सुरु असल्याचं बघायला मिळालं. मोदींच्या डिग्रीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने एक वेगळी भूमिका घेतली. मोदींच्या डिग्री विषयी चर्चा करण्याची गरज नाही, असं राष्ट्रवादीने म्हटलं. तर संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींची डिग्री खरी असली पाहिजे, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या जेपीसी चौकशीपेक्षा कोर्टाच्या समितीकडूनच चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. तर ठाकरे गट आणि काँग्रेस चौकशीवर ठाम आहे. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सुद्धा महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. तर दुसरीकडे आज चंद्रकांत पाटील यांचं बाबरी मशिदबाबत मोठं विधान समोर आलं. त्यांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय. पण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी समर्थन केलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.