राहुल गांधी यांच्या नव्या यात्रेचा व्हिडिओ, अटलजींची कविता अन् स्मृती ईराणींचा आवाज, मग…
Congress Delete Nyay Yatra Promo Video | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या यात्रेचा पार्ट २ येत्या १४ जानेवारीपासून सुरु करणार आहे. यावेळी काँग्रेसने सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर काँग्रेस ट्रोल झाली. मग व्हिडिओ डिलिट करण्याची नामुष्की काँग्रेस सोशल मीडिया टीमवर आली.
नवी दिल्ली, दि. 30 डिसेंबर 2023 | काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंतच्या यात्रेचा पार्ट २ सुरु करण्यात येणार आहे. ही यात्रा भारत न्याय यात्रा असणार आहे. 350 दिवसांची ही यात्रा 6200 किमी अंतर पार करणार आहे. देशातील 14 राज्यातील 85 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. या यात्रेसंदर्भातील एका व्हिडिओ काँग्रेसकडून तयार करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आला. त्यानंतर युजर्सकडून प्रतिक्रिया मिळाल्यावर तो व्हिडिओ डिलिट करण्यात आला. काँग्रेसच्या या व्हिडिओत भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांची कविता आणि स्मृती इराणीचा आवाज होता. त्यानंतर संपूर्ण कांग्रेस पप्पू असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या.
काय आहे व्हिडिओमध्ये
काँग्रेसने शेअर करुन डिलिट केलेल्या व्हिडिओमध्ये 2016 मधील स्मृती ईराणी यांचे भाषण आहे. या भाषणात स्मृती इराणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता वापरली होती. स्मृती ईराणी यांनी लोकसभेत हे भाषण केले होते. व्हिडिओमध्ये सुरुवातीला ग्राफिक्समध्ये मुलगा विचारतो, “डैड गूजपंप क्या होता है।” मग वडील उत्तर देतात “गूजबंप, आओ मेरे साथ।” त्यानंतर स्मृती ईराणी यांचा आवाज आहे. त्यात त्या म्हणतात, “‘हम जिएंगे तो भारत मां के लिए, मरेंगे तो भारत मां के लिए और मरने के बाद गंगाजल में बहती हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उसमें से एक ही आवाज आएगी भारत माता की जय-भारत माता की जय’। ”
Congress used Atal Bihari Vajpayee Ji's poem in voice of @smritiirani ma'am in Bharat Nyay Yatra Promo video.
The whole Congress is became Pappu now 🤣pic.twitter.com/LzHINEFkAS
— Sunanda Roy 👑 (@SaffronSunanda) December 29, 2023
युजर्सकडून काँग्रेस ट्रोल
देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. केंद्रात सत्ता मिळवण्याची काँग्रेसची महत्वकांक्षा आहेत. त्यावेळी भाजप नेत्यांची कविता आणि आवाजाचा वापर व्हिडिओत करण्याची चूक काँग्रेसच्या टीमने केली. त्यानंतर युजर्सकडून काँग्रेस ट्रोल झाले. संपूर्ण काँग्रेस पप्पू असल्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या.