नवज्योतसिंग सिद्धूंसह मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आणखी चौघे?; वाचा, ‘कॅप्टन’च्या राजीनाम्यानंतर पंजाबमध्ये काय होणार?
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत कुरबुरीला कंटाळून अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. (Who will be captain of the Congress in Punjab CLP meeting apart from Sidhu these 4 leaders are also in the race)
चंदीगड: गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत कुरबुरीला कंटाळून अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अमरिंदर सिंग संपूर्ण मंत्रिमंळासह राजीनामा सुपूर्द केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यात येणार आहे. (Who will be captain of the Congress in Punjab CLP meeting apart from Sidhu these 4 leaders are also in the race)
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी पाच नेत्यांची नावे चर्चेत आहेत. नवज्योतसिंग सिद्धू, सुनील जाखड, प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेरका आणि बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू यांची नावे चर्चेत आहेत.
नवजोतसिंग सिद्धू
पंजाबमध्ये झालेल्या बदलाला नवज्योतसिंग सिद्धूच असल्याचं बोललं जात आहे. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात उघड पंगा घेतला होता. दोघांनी एकमेकांना चेकमेट करतानाच एकमेकांवर टीकाही केली होती. अगदी सोनिया गांधी आणि राहुल गांधींपर्यंत हा वाद गेलो होता. यावेळी सिद्धू यांनी सातत्याने मुख्यमंत्रीपदाचा दावाही केला. आपण कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच तोडीचेच नेते असल्याचं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धू यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, हायकमांड सिद्धू यांच्याकडे पंजाबची कॅप्टनशीप देते की धक्कातंत्राचा अवलंब करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनील जाखड
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नावही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यताती आहे. काही लोक तर त्यांना मुख्यमंत्रीच समजत आहेत. सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद जाण्यापूर्वी जाखड प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे जाखड यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबवर मजबूत पकड असलेल्या नेत्यांपैकी जाखड एक आहेत. 2002मध्ये त्यांनी अबोहरमधून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. जाखड हे हिंदू आहेत. त्यामुळेही त्यांच्या पारड्यात मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. कृषी कायद्याचं समर्थन करणाऱ्या मोजक्याच नेत्यांपैकी ते एक आहेत. सुनील जाखड यांचे वडील बलराम जाखड हे काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक होते. ते मध्यप्रदेशाचे राज्यपाल आणि लोकसभा अध्यक्षही होते.
प्रतापसिंग बाजवा
राज्यसभेतील खासदार प्रतापसिंग बाजवा यांच्याकडे मुख्यमंत्रीदाची धुरा जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पंजाबच्या राजकारणातील बडे नेते म्हणून बाजवा यांची ओळख आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे विरोधक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. शेतकरी आणि सामान्य लोकांमधील लोकप्रिय नेते असलेल्या बाजवाच्या नेतृत्वातच काँग्रेसलाही आगामी निवडणुकांना सामोरे जाणं आवडेल. बाजवांच्या प्रयत्नामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला उचित भाव मिळाला होता. 2012च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना हटवून बाजवा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा एकदा सूत्रे जाणार की नाही हे आजच्या बैठकीतच स्पष्ट होणार आहे.
राजकुमार वेरका
नवज्योतसिंग सिद्धू यांच्याविरोधात आघाडी उघडणारे नेते म्हणून राजकुमार वेरका यांना पाहिलं जातं. तेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. 2012 आणि 2017मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे व्हाईस चेअरमन होते. त्यांनी नुकतंच एक विधान केलं होतं. त्यामुळे पक्षाची चांगली गोची झाली होती. शेतकरी आंदोलन काँग्रेस प्रायोजित असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे दलित चेहरा म्हणून वेरका यांनी काँग्रेस मुख्यमंत्री म्हणून पसंती देणार का? हे पाहावं लागणार आहे.
रवनीतसिंग बिट्टू
खासदार रवनीतसिंग बिट्टू हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. ते पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. काँग्रेसचे बडे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांनी नेहमीच पक्षश्रेष्ठींच्या मनासारखं काम केलं आहे. 2014 आणि 2019मध्ये ते विजयी झाले होते. दहशतवाद्यांनी नुकतीच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. (Who will be captain of the Congress in Punjab CLP meeting apart from Sidhu these 4 leaders are also in the race)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 September 2021 https://t.co/JFFzyAPU8P #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 18, 2021
संबंधित बातम्या:
Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका
(Who will be captain of the Congress in Punjab CLP meeting apart from Sidhu these 4 leaders are also in the race)