Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची ‘तुंबळ लढाई’ सुरु? राऊतांना दिल्लीत का ‘महाभारत’ आठवतंय?; वाचा सविस्तर

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) दिल्लीत गेलेत. पवारांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यानंतर राऊत दिल्लीत पोहोचलेत.

VIDEO: ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची 'तुंबळ लढाई' सुरु? राऊतांना दिल्लीत का 'महाभारत' आठवतंय?; वाचा सविस्तर
sanjay raut
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 6:22 PM

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत दिल्लीत गेलेत. पवारांनी गेल्या आठवड्यातच दिल्लीचा दौरा केलाय आणि त्यानंतर राऊत दिल्लीत पोहोचलेत. त्यामुळे मोदी-ठाकरेंच्या दिल्ली भेटीनंतर उठलेलं वादळ शांत होण्याऐवजी आणखी पेटणार असंच दिसतंय. त्यातच संजय राऊतांनी दिल्लीत पोहोचताच महाभारतातल्या लढाईचा दाखला देत राज्यातल्या ठाकरे सरकारची काय स्थिती आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. (why sanjay raut given mahabharata’s reference on maharashtra politics?; read details)

राऊत नेमकं काय म्हणालेत?

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राऊत म्हणाले, तुंबळ युद्ध ज्यावेळेस सुरु झालं चारही बाजूनं महाभारतात, तेव्हा कृष्णानं अर्जूनाचा रथ, आता लढायचंच आहे आपणाला, चारही बाजूनं जरी शत्रूनं घेरलं असलं तरी युद्ध आपल्याला लढायचंय आणि जिंकायचंय आणि त्या हिंमतीनं कृष्ण आणि अर्जून हा जो मुख्य रथ होता तो घेऊन ते कुरुक्षेत्राच्या मधोमध घेऊन आले, लढत राहीले. समोरुन आलेले सगळे बाण त्यांनी नि:ष्प्रभ केले, हत्यारं नि:ष्प्रभ केली. हे महाभारताचं कथानक आहे. मला असं वाटतं की, महाराष्ट्रात यापेक्षा काही वेगळं घडत नाहीय. राऊतांनी महाभारताचं उदाहरण देत महाराष्ट्राचं राजकारण मांडलं त्यावेळेस आमच्या प्रतिनिधीनं त्यांना यातल्या भूमिका कोण कुठल्या वठवतंय याबाबत राऊतांना विचारलं तर ते म्हणाले, असंय की पांडवांनाच घेरलं जातं ना? कौरव आहेत ना चारही बाजूनं, कौरव सेना आमच्यावरती हल्ले करतेय. कौरव हे खोट्याच्या, अधर्माच्या बाजूनं होते हे लक्षात घ्या. कौरवांची लढाई सत्तेसाठी होती आणि त्यासाठी कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी होती.

राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ काय निघतो?

राऊतांच्या वक्तव्याचा सरळसरळ अर्थ असा निघतो की, सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आता तुंबळ लढाई करतायत. ते आणि त्यांचं सरकार चोहोबाजूंनी घेरलं गेलंय. आणि सरकार वाचवायचं तर त्यासाठी त्यांच्याकडे तुंबळ लढाईशिवाय पर्यायही नाही. राऊतांना कौरव कोण म्हणून विचारण्याची गरज नाही ते दिसतंच आहे. भाजपच्या पडळकरांपासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत विविध नेते रोज हल्ले चढवतात. त्यात तुषार भोसलेंपासून ते राणेंपर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे. पण प्रश्न कोण टीका करतंय याचा नाही तर सरकारच्या अस्तित्वाची लढाई सुरु झालीय असा राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ घ्यायचा का हा आहे.

कोण कृष्ण?, कोण अर्जुन?

राऊत म्हणतायत तसं खरंच महाराष्ट्रात महाभारतासारखी स्थिती निर्माण झालीय का? गेल्या काही दिवसातल्या घडामोडींनी तसं चित्रं तरी निर्माण झालेलं दिसतय. मग ह्या लढाईत कृष्ण कोण आणि अर्जुन कोण? राऊतांसाठी तर ह्या महाभारताचे अर्जुन उद्धव ठाकरेच आहेत पण मग कृष्ण कोण? शरद पवार की स्वत: संजय राऊत? सांगणं कठिण आहे. राऊत स्वत:ला कृष्ण म्हणून घेणार नाहीत आणि शरद पवारांना कृष्ण म्हणावं एवढा आत्मविश्वास महाविकास आघाडीत आहे? एक मात्र निश्चित, ह्या महाभारताची सगळी सूत्रं हे शरद पवारांच्या हाती आहेत याबद्दल कुणाचं दूमत नसावं. त्यांना वगळून महाराष्ट्राच्या महाभारतात खरंच काही घडेल?

राऊतांचे ‘नरेंद्रभाई’

शिवसेनेचे नेते असोत की खुद्द संजय राऊत हे कधीच नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत नाहीत. ठाकरे-मोदी भेटीनंतर तर मोदींसोबत ठाकरेंचे कसे वैयक्तीक संबंध आहेत हेच सांगण्याचा राऊत खटाटोप करत असतात. अलिकडेच त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी मोदी हे ‘नरेंद्रभाई’ असल्याचं आवर्जून सांगितलं. त्याआधी ‘मोदीच देशातले सर्वोच्च नेते’ असल्याचही राऊत म्हणाले. आजही दिल्लीत राऊतांनी ‘मोदी राग’ कायम ठेवला. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राऊतांनी नरेंद्र मोदी आणि ठाकरेंच्या वैयक्तिक संबंधांची पुन्हा उजळणी केली. त्यामुळेच राज्यातल्या भाजप नेत्यांना कौरव सेना ठरवताना राऊत मोदींना मात्र बाजूला काढताना दिसतायत. महाभारतात कौरव आणि पांडव, अशा दोघांनाही एकच व्यक्ती आदरस्थानी होती. ते म्हणजे भीष्म. राऊत मोदींना भीष्माचार्य ठरवत, महाभारताची ही लढाई तर लढत नाहीयत? की भाजपसोबत जाण्याचा एक रस्ता ते कायम ठेवतायत?

कुरुक्षेत्रावरचा ‘संजय’

महाभारताच्या युद्धभूमीवर काय काय चाललेलं आहे याचा इतिवृत्तांत सांगण्याचं काम संजयकडं होतं. धृतराष्ट्राला दृष्टी नव्हती पण संजयला महर्षी व्यासानं दिव्यदृष्टी दिलेली होती. महालात बसून तो युद्धभूमीवरच्या सर्व घडामोडी धृतराष्ट्राला सांगायचा. आता जे काही महाराष्ट्रात घडतंय त्याचा थांगपत्ता महाराष्ट्रातल्या राजकीय पंडीतांना लागताना दिसत नाहीय. भाजप आणि सेना एकत्र येणार, फडणवीस नसतील मुख्यमंत्री, शरद पवारच भाजपसोबत जाणार, पुढचे पंधरा दिवस सरकारसाठी महत्वाचे, केंद्र सरकारनं ईडी, सीबीआयच्या मार्फत दबाव तीव्र केलाय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात. त्याला फारसा पुरावा असा नाहीच. पण महाराष्ट्रातल्या महाभारताचे सध्या तरी संजय राऊत हेच ‘दिव्यदृष्टी’ असलेले ‘संजय’ आहेत. ते जे काही सांगतायत त्यावर विश्वास ठेवला तर ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची ‘तुंबळ लढाई’ सुरु झाल्याचं दिसतंय. (why sanjay raut given mahabharata’s reference on maharashtra politics?; read details)

संबंधित बातम्या:

इतिहासात पहिल्यांदाच ‘राजभवन’मधून भाजप कार्यालय सुरू; नाना पटोलेंची खोचक टीका

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे; राधाकृष्ण विखे-पाटलांचं भाकीत

(why sanjay raut given mahabharata’s reference on maharashtra politics?; read details)

मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....