Harbhajan Singh Retirement: हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा, 23 वर्षांचा क्रिकेटमधला प्रवास संपला
सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले. माझा क्रिकेटमधला 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणार्या सर्वांचे मी आभार मानतो"
जालंधर: भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने (Harbhajan Singh Retirement) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. 23 वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळल्यानंतर नाताळच्या पूर्वसंध्येला हरभजनने निवृत्तीची घोषणा केली. मूळचा जालंधरचा असलेल्या 41 वर्षीय हरभजनने 103 कसोटी, 236 वनडे आणि 28 टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले.
“सर्व चांगल्या गोष्टींना शेवट असतो. मला आयुष्यात सर्व काही देणाऱ्या क्रिकेटचा आज मी निरोप घेत आहे. माझा क्रिकेटमधला हा 23 वर्षांच प्रवास सुंदर आणि संस्मरणीय करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. मी मनापासून आभार मानतो” असे हरभजनने केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
2016 मध्ये यूएई विरुद्धच्या टी-20 सामन्यात हरभजनने शेवटचे भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर तो फक्त देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत होता. तो आयपीएलमध्ये खेळणे चालूच ठेवणार आहे. हरभजन सिंगने भारताकडून खेळताना नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या. 236 वनडे सामन्यात 227 विकेट घेतल्या.
All good things come to an end and today as I bid adieu to the game that has given me everything in life, I would like to thank everyone who made this 23-year-long journey beautiful and memorable. My heartfelt thank you ? Grateful .https://t.co/iD6WHU46MU
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 24, 2021
टी-20 या छोट्या फॉर्मेटमध्ये हरभजनने 28 सामन्यात 25 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये हरभजन आतापर्यंत 13 सीझनमध्ये 163 वनडे सामने खेळला आहे. 2020 च्या एकाच मोसमात तो मैदानात दिसला नव्हता. 26 च्या सरासरीने त्याने तिथे 150 विकेट घेतल्या आहेत. 18/5 ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
संबंधित बातम्या: Sachin Tendulkar : सिराजच्या पायात स्प्रिंग असल्यासारखं वाटतं, सचिन तेंडुलकरच्या शाबासकीनंतर मोहम्मद सिराज म्हणाला… आशियाई 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा; सलामीच्या लढतीमध्ये भारताचा विजय; यूएईवर 154 धावांनी मात IND vs SA: उपकर्णधार झाल्यामुळे तुझे केस पांढरे झाले की काय? मयंकच्या प्रश्नावर राहुलचं हटके उत्तर