आशिष शेलार यांच्या समर्थकाचा भाजपच्याच अदृश्य शक्तीमुळे पराभव? कसं घडलं MCA अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचे राजकारण?

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई क्रिकेटचे असलेले महत्त्व, वानखेडे स्टेडीयम आणि वलय यामुळे भाजप नेते आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आपले वर्चस्व राहावे असे वाटत होते. पण महाराष्ट्र भाजपमधील अदृश्य शक्ती आणि आशिष शेलार यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षामुळे निवडणुकीच्या डावपेचाच्या पुढील गुप्त घटना घडल्या.

आशिष शेलार यांच्या समर्थकाचा भाजपच्याच अदृश्य शक्तीमुळे पराभव? कसं घडलं MCA अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचे राजकारण?
कसं घडलं MCA अध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीचे राजकारण?
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 10:10 PM

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक पार पडली. दिवंगत एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झाल्यामुळे अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी मारली. ही निवडणूक चुरशीची ठरली. कारण विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांनी ही निवडणूक लढवून एमसीएची सूत्रे हाती घ्यावीत, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आग्रही भूमिका होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपमधील एका मोठ्या अदृश्य शक्तीने या निवडणुकीत रस घेतला. अजिंक्य नाईक यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे सभाळवीत असे या अदृश्य शक्तीलाही वाटत होते.

MCA ची स्वतःची कोट्यवधीची मालमत्ता आहे. MCA शी जोडलेले असणे हा उच्चभ्रू वर्गात स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अजिंक्य नाईक यांनी त्यांच्या सचिव पदाच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात मुंबईतील क्रिकेट पुन्हा नावारुपाला आणले. विशेष म्हणजे 8 वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मुंबईचा संघ रणजी करंडकही जिंकला. त्यामुळे शरद पवार आणि भाजपातील अदृश्य राजकिय शक्तीला अजिंक्य नाईक हेच योग्य दावेदार वाटत होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबई क्रिकेटचे असलेले महत्त्व, वानखेडे स्टेडीयम आणि वलय यामुळे भाजप नेते आशिष शेलार यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनवर आपले वर्चस्व राहावे असे वाटत होते. त्यामुळे उपाध्यक्ष असलेले आपले समर्थक संजय नाईक यांना त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण अजिंक्य नाईक यांना पाठिंबा दिलेली ती अदृश्य शक्ती आणि आशिष शेलार यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षामुळे निवडणुकीच्या डावपेचाच्या पुढील गुप्त घटना घडल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निवडणुकीच्या डावपेचाच्या शेवटच्या टप्प्यात विशेष लक्ष दिले. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत अन्य विषयांबरोबर MCA निवडणुकीच्या डावपेचांबाबत चर्चा झाल्याचे कळते. आशिष शेलार यांचा पाठिंबा असलेले संजय नाईक पराभूत व्हावेत यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही अखेरच्या टप्प्यात मैदानात उतरले. त्यांचा प्रभाव असलेल्या क्रिकेट क्लब मतदारांना उद्धव ठाकरेंनी अजिंक्य नाईक यांना मतदान करण्याच्या सूचना केल्या.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.