India south Africa tour: विराट कोहली गायब, पहिल्या टेस्टआधी टीम इंडियाची BBQ पार्टी
हेड कोच राहुल द्रविड यांच्यासोबत बार्बीक्यू नाईटआऊटची मजा लुटली. एका मोठ्या हिरव्यागार लॉनवर त्यांनी आफ्रिकेतील खाद्यपदार्थांचा स्वाद चाखला. यावेळी कर्णधार विराट कोहली मात्र दिसला नाही.
सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India south Africa tour) दाखल झाल्यापासून भारतीय संघ एकाबाजूला कसून सराव करतोय. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी मेहनत घेतोय. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा मनमुराद आनंदही लुटताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनी मंगळवारी रात्री सेंच्युरियनमध्ये बार्बीक्यू नाईट आऊटचा आनंद घेतला. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल यांनी हेड कोच राहुल द्रविड यांच्यासोबत बार्बीक्यू नाईटआऊटची मजा लुटली. एका मोठ्या हिरव्यागार लॉनवर त्यांनी आफ्रिकेतील खाद्यपदार्थांचा स्वाद चाखला. यावेळी कर्णधार विराट कोहली मात्र दिसला नाही.
यावेळी टीम सोबत सपोर्ट स्टाफमधील विक्रम राठोड, फिजिओ नितीन पटेल आणि अन्य सदस्यही होते. मयांक अग्रवालने या नाईट आऊटचे फोटोही पोस्ट केले आहेत. चार्टड प्लेनने भारतीय संघ मुंबईहून जोहान्सबर्गला दाखल झाला. तिथे एका रिसॉर्टमध्ये भारतीय खेळाडू उतरले आहेत. 26 डिसेंबरपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून 19 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होईल. कोविडमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला सामना प्रेक्षकांविना पार पडणार आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाने तिकिटांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nothing like a fiery BBQ night ? pic.twitter.com/0S7h7be5ni
— Mayank Agarwal (@mayankcricket) December 21, 2021
सगळ्यांच्या नजर विराट-राहुल या कॅप्टन-कोचच्या नव्या जोडगळीकडे लागल्या आहेत. मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून चांगली सुरुवात केली आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील आव्हान सोपं नसेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कारण मागच्या 29 वर्षात दक्षिण आफ्रिकेच्या सात दौऱ्यांमध्ये शक्य न झालेली कामगिरी करुन दाखवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
संबंधित बातम्या:
PKL8: महाराष्ट्राचा सुपुत्र यूपीचा आधारस्तंभ, हलाखीच्या परिस्थितीवर मात करणाऱ्या श्रीकांत जाधवची गोष्ट घरोघरी सिलेंडर पोहोचवणाऱ्याच्या मुलाचं IPL मध्ये फळफळेल नशीब; 2022च्या लिलावात लागू शकते मोठी बोली India vs South Africa: कोणाला बसवायचं, कोणाला खेळवायचं? कोहली-द्रविड जोडी समोर मोठा पेच