IND vs ENG 3rd Test Day 1 Live : पहिला दिवस इंग्लंडचा, सलामीवीरांची 120 धावांची भागीदारी, भारतीय फलंदाज-गोलंदाज फेल
India vs England 3rd Test Day 1 Live Score: इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले.
IND vs ENG : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा भारतासाठी प्रचंड खराब ठरला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे याने 18 धावा केल्या. तर इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
इंग्लंडच्या सलामीवीरांची संयमी आणि मोठी भागीदारी
इंग्लंडचे सलामीवीर रॉली बन्र्स आणि हसीब हमीद यांनी संयमी सुरुवात केली. विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या शेवटच्या षटकापर्यंत दोघं नाबाद राहिले. दोघांनी एकमेकांचं अर्धशतक साजरी केलं. रॉलीने नाबाद 125 चेंडूत 52 धावा केल्या. तर हमीदने नाबाद 60 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेण्यात यश आलेलं नाही. तर इंग्लंडच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत 42 षटकांत 120 धावा झाल्या आहेत.
भारताचा पहिला डाव
गेल्या कसोटी सामन्यात एकहाती संघाची कमान सांभळणारा सलामीवीर के एल राहुल हा आज पहिल्याच षटकाच्या पाचव्या बोलवर बाद झाला. इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन याने पहिल्याच षटकात त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुन्हा पाचव्या षटकात जेम्स अँडरसन याने दुसरा बळी घेतला. यावेळी त्याने चेतेश्वर पुजाराला झेलबाद केलं. जोस बटलरने त्याचा झेल टिपला. त्यावेळी भारतीय संघ अवघ्या चार धावांवर होता. पुजारा नंतर कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण जेम्स अँडरसन आणि जोस बटलर या दोघांनी मिळून कोहलीला झेलबाद केलं. जेम्स अँडरसन याच्या बोलवर बटलरने त्याचा झेल टिपला.
विराट कोहलीनंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेकडे भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा होत्या. रोहित आणि अजिंक्य मोठी भागीदारी करुन आपल्या खेळीचं अद्भूत दर्शन घडवून देतील, अशी आशा लागली होती. पण इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सन याने आशांवर पाणी फेरलं. त्याने अजिंक्य राहणेला झेलबाद केला. यावेळी देखील जोस बटलर यानेच त्याचा झेल टिपला. त्यानंतर भारतीय संघाला जणू काही उतरती कळाच लागली. ऋषभ पंत 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर सलामीवर रोहित शर्माही झेलबाद झाला. त्यापाठोपाठ काही धावांच्या अंतरावर एकामागेएक मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज बाद झाले. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 78 धावांवर बाद झाला.
Key Events
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात भारत विजयाच्या उंबरठ्यावर असताना पावसाच्या व्यत्ययामुळे सामना अनिर्णीत सुटला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूंने उत्तम कामगिरी करत 151 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात कोणताच बदल करण्यात आलेला नाही. विराट कोहलीने नाणेफेकीदरम्यान ही माहिती दिली. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघात मात्र दोन बदल करण्यात आल्याची माहिती कर्णधार जो रुटने दिली. इंग्लंड संघात तिसऱ्या कसोटीसाठी फलंदाज डेविड मलान हा सिबलीच्या जागी खेळणार आहे. तर क्रेग ओवरटन मार्क वुडच्या जागी गोलंदाजी करेल.
LIVE Cricket Score & Updates
-
टीम इंडियाला दहावा झटका, 78 धावांमध्ये संपूर्ण संघ तंबूत
टीम इंडियाला दहावा झटका, 78 धावांमध्ये संपूर्ण संघ तंबूत, भारतीय संघाचा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय अंगलटी
-
IND vs ENG : काही मिनिटांत भारताचे फलंदाज तंबूत परत
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर एक एक फलंदाज बाद होत गेले. जाडेजा, बुमराह आणि शमी यांच्या बाद होण्याने भारताची अवस्था बिकट झाली आहे.
-
-
IND vs ENG : भारताचे सात गडी तंबूत परत
सुरुवातीपासून मैदानावर टिकलेला भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला आहे. त्याच्या पाठोपाठ मागील सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा मोहम्मद शमीही तंबूत परतला आहे. क्रेग ओवरटनने दोघांचा विकेट घेत भारताचे सात गडी तंबूत धाडले आहेत.
-
IND vs ENG : इंग्लंडला आणखी एक यश, पंतही बाद
ऑली रॉबिनसनच्या चेंडूवर बटलरने पंतचा झेल घेत भारताला पाचवा झटका दिला आहे. आता फलंदाजीला रवींद्र जाडेजा आलो आहे.
-
IND vs ENG : दुसऱ्या सेशनला सुरुवात
लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. भारताकडून सध्या ऋषभ पंत आणि रोहित शर्मा फलंदाजी करत आहेत.
-
-
IND vs ENG : लंचपूर्वी भारतीय संघ अडचणीत
दिवसाचं पहिलं सेशन संपल आहे. भारतीय संघाचे चार फलंदाज तंबूत परतल्याने संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 3 तर रॉबिनसनने 1 विकेट घेतला आहे. सध्या भारताची स्थिती 56 धावांवर 4 बाद अशी आहे.
That will be Lunch on Day 1 of the 3rd Test.#TeamIndia lose 4 wickets in the morning session.
Scorecard – https://t.co/FChN8SV3VR #ENGvIND pic.twitter.com/4Gxds5IHd1
— BCCI (@BCCI) August 25, 2021
-
IND vs ENG : रहाणेही तंबूत परत
काही काळ भारताचा डाव रहाणे आणि शर्मा सावरत असताना रहाणेही बाद झाला आहे. ऑली रॉबिनसनच्या चेंडूवर बटलरने रहाणेचा झेल पकडला आहे.
-
IND vs ENG : भारताच्या 50 धावा पूर्ण
पहिले तीन विकेट पटपट गेल्याने भारतीय संघ अडचणीत आहे. सध्या रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे फलंदाजी करत असून भारताने 50 धावा पूर्ण केल्या आहेत.
-
IND vs ENG : जेम्स अँडरसन जोमात
इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने तीन भारतीय फलंदाजाना तंबूत धाडलं आहे. राहुल, पुजारा आणि विराटचा विकेट जेम्सने घेतला आहे.
James Anderson is on ?
He picks up his third scalp dismissing Indian skipper Virat Kohli for 7.
?? are 21/3. #WTC23 | #ENGvIND | https://t.co/AZCdNvbRbc pic.twitter.com/6oW8DCSMHp
— ICC (@ICC) August 25, 2021
-
IND vs ENG : भारतीय संघाला मोठा झटका, विराट कोहलीही बाद
भारतीय संघाला सर्वात मोठा झटका बसला आहे. पुजारानंतर आता भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विकेटही जेम्स अँडरसनने घेत इंग्लंडला तीन विकेट्स मिळवून दिले आहेत.विराटचा झेलही बटलरनेच त्याचा घेतला आहे.
-
IND vs ENG : राहुल पाठोपाठ पुजाराही तंबूत परत
भारतीय संघाला अजून एक झटका बसला आहे. केएल राहुल पाठोपाठ भारताचा खेळाडू पुजाराही जेम्स अँडरसनच्या चेंडूवर पुजारा बाद झाला आहे. राहुलप्रमाणे बटलरनेच त्याचा झेल घेतला आहे.
-
IND vs ENG : केएल राहुल बाद
तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अंडरसनने भारताचा सलामीवीर केएल राहुलला तंबूत धा़डलं आहे. यष्टीरक्षक बटलरने राहुलचा झेल पकडला आहे.
-
IND vs ENG : सामन्याला सुरुवात रोहित-राहुल मैदानात, अँडरसनच्या हातात चेंडू
तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीला उतरले आहेत. तर इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने गोलंदाजीला सुरुवात केली आहे.
-
IND vs ENG : दोन्ही संघाचे अंतिम 11
भारत: विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लैंड: जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेयरेस्टो, जॉस बटलर (उपकर्णधार), मोईन अली, सॅम करन, ऑली रॉबिनसन, क्रेग ओवरटन आणि जेम्स एंडरसन.
-
IND vs ENG : इंग्लंडच्या संघात दोन बदल
तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात दोन बदल केले आहेत. डेविड मलान हा सिबलीच्या जागी खेळणार आहे. तर क्रेग ओवरटन मार्क वुडच्या जागी गोलंदाजी करेल.
-
IND vs ENG : भारतीय संघात कोणताही बदल नाही
भारतीय क्रिकेट संघात तिसऱ्या कसोटीसाठी कोणताच बदल नसल्याचे विराट कोहलीने सांगितले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील खेळाडूच तिसरा सामनाही खेळती.
Toss & Team Update from Headingley!#TeamIndia have elected to bat against England in the third #ENGvIND Test.
Follow the match ? https://t.co/FChN8SDsxh
Here’s India’s Playing XI ? pic.twitter.com/f7SSVgHInj
— BCCI (@BCCI) August 25, 2021
-
IND vs ENG : नाणेफेक जिंकत विराटने घेतली फलंदाजी
तिसऱ्या सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. भारतीय कर्णधार विराटने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे.
3rd Test. India win the toss and elect to bat https://t.co/FChN8SV3VR #ENGvIND
— BCCI (@BCCI) August 25, 2021
Published On - Aug 25,2021 3:04 PM