IND vs ENG 4th Test Day 3 Live : अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द, 3 बाद 270 धावांसह भारत मजबूत स्थितीत
India vs England 1st Test Day 1 Live Score: भारताने प्रथम फलंदाजी करताना 191 धावा केल्यानंतर इंग्लंडने तब्बल 290 धावा ठोकल्या. त्यानंतर इंग्लंडच्या 99 धावांच्या आघाडीचा पाठलाग करत आहे.
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात सुरु आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (127) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (61) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 270 धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला 171 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली (22) आणि रवींद्र जाडेजा (9) नाबाद आहेत.
दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने 83 धावांची सलामी दिली. 46 धावांवर असताना लोकेश राहुल जेम्स अँडरसनची शिकार ठरला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने दिडशतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. रोहितने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं 8 वं आणि परदेशातलं पहिलं शतक ठोकलं. त्याने 127 धावांची खेळी केली. तर पुजाराने 61 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑली रॉबिन्सनने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवू दिला. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने विकेट जाऊ दिली नाही.
Key Events
इंग्लंड दौऱ्यावर भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.
चेतेश्वर पुजारा धिम्या गतीने धावा जमवतो, त्याच्या स्ट्राईक रेटवरुन त्याला नेहमीच ट्रोल केलं जातं. अनेकद्या त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील होते. मात्र आजच्या डावात पुजारा वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. त्याने 127 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली. त्याने रोहितसोबत दिडशतकी भागीदारी केली. पुजाराने आज काही आक्रम फटकेदेखील लगावले. पुजारासोबत लोकेश राहुलनेदेखील चांगली सुरुवात करुन दिली. त्याला त्याचं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. मात्र त्याने रोहित शर्मासोबत 83 धावांची भागीदारी केली. वैयक्तिक 46 धावांवर तो बाद झाला.
LIVE Cricket Score & Updates
-
अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द, 3 बाद 270 धावांसह भारत मजबूत स्थितीत
अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित 40 मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने 3 बाद 270 धावांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भारताना 171 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली (22) आणि रवींद्र जाडेजा (9) नाबाद आहेत.
-
भारताला तिसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 61 धावांवर बाद
भारताने चेतेश्वर पुजाराच्या रुपात तिसरी विकेट गमावली आहे. 61 धावांवर असताना ऑली रॉबिन्सनने मोईन अलीकरवी झेलबाद केलं. (भारत 237/3)
-
-
भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा 127 धावांवर बाद
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने रोहित शर्माला 127 धावांवर असताना ख्रिस वोक्सकरवी झेलबाद केलं. (भारत 236/2)
-
रोहितचं शतक, पाठोपाठ पुजाराचा अर्धशतक, भारत सुस्थितीत
रोहित शर्माने शतक झळकावल्यानंतर तिसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केलं आहे. (भारत 217/1)
-
षटकार ठोकत रोहित शर्माचं शतक, परदेशातली पहिली टेस्ट सेंच्युरी
64 व्या षटकात मोईन अलीला षटकार फटकावत रोहित शर्माने परदेशातलं पहिलं कसोटी शतक झळकावलं आहे. या शतकामुळे भारत या सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला आहे. (भारत 195/1)
-
-
IND vs ENG : हिटमॅनचं अप्रतिम अर्धशतक
रोहितनं संघाची परिस्थिती पाहत धडाकेबाज नाही तर संयमी खेळी करत अर्धशतक लगावलं आहे. त्याने 148 चेंडूत 5 चौकारांसह हे अर्धशतक ठोकले आहे.
?????!
Hitman @ImRo45 brings up his 3rd half-century of the series! He also crosses 1k runs in international cricket in 2021.??#TeamIndia #ENGvIND
Scorecard – https://t.co/OOZebPnBZU pic.twitter.com/uwEjdSnX7H
— BCCI (@BCCI) September 4, 2021
-
IND vs ENG : दुसऱ्या सेशनला सुरुवात
दिवसाच्या दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. भारताचा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा सध्या मैदानात आहेत.
-
IND vs ENG : पहिलं सेशन समाप्त, भारताची इंग्लंडवर आघाडी
दिवसाचं पहिलं सेशन संपून सामन्यात लंच ब्रेक झाला आहे. सध्या भारत 108 धावांवर खेळत असून भारताने 9 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत.
That will be Lunch on Day 3 of the 4th Test.#TeamIndia 191 & 108/1, lead England 290 by 9 runs.
65 runs added in the first session with a loss of 1 wicket.
Scorecard – https://t.co/OOZebPnBZU #ENGvIND pic.twitter.com/CHXOjnSnKQ
— BCCI (@BCCI) September 4, 2021
-
IND vs ENG : भारताने मिळवली आघाडी
भारताकडून रोहित शर्माच्या संयमी खेळीमुळे भारताने इंग्लंडने दिलेली आघाडी पूर्ण करत आता इंग्लंडवर आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या मैदानात पुजारा आणि रोहित आहेत.
-
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल 46 धावांवर बाद
भारताने लोकेश राहुलच्या रुपात पहिली विकेट गमावली आहे. 46 धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केलं. (भारत 83/1)
-
IND vs ENG : भारतीय संघासाठी दिवसाची चांगली सुरुवात
चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यापासून भारतीय संघाचे सलामीवीर रोहित आणि राहुल विश्वसणीय फलंदाजी करत आहेत. दोघेही चांगल्या स्थितीत दिसून येत असल्यामुळे इंग्लंडची डोकेदुखी वाढली आहे.
-
भारताचं अर्धशतक
सलामीवीर रोहित शर्मा (26) आणि लोकेश राहुलने (23) 19 षटकात धावफलकावर भारताचं अर्धशत झळकावलं आहे.
-
IND vs ENG : भारतीय संघाचं अर्धशतक
भारतीय संघाचा दुसरा डाव सुरु झाला आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल हे भारताला एक उत्तम आघाडी मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत. नुकतीच दोघांची 50 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे.
-
IND vs ENG : दिवसाचा पहिला चौकार रोहितच्या बॅटमधून
हिटमॅन रोहित शर्माने पहिल्याच षटकात जेम्स अँडरसनच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
IND vs ENG : भारताकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा
चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाली असून अजूनही इंग्लंडकडे 54 धावांची आघाडी आहे. त्यामुळे भारताला एक मोठी धावसंख्या उभी करणं आवश्यक आहे.
-
IND vs ENG : चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात
चौथ्या कसोटीतील चौथ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आहे. भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीला आले आहेत. तर इंग्लंडकडून जेम्स अँडरसन गोलंदाजी करत आहे.
Published On - Sep 04,2021 3:30 PM