IND vs ENG 2nd Test Day 4 Live : अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द, भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल

| Updated on: Aug 17, 2021 | 3:23 PM

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा चौथा दिवस आहे.

IND vs ENG 2nd Test Day 4 Live : अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द, भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा चौथा दिवस होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 364 धावा जमवल्या तर त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंडने काल तिसऱ्या सर्वबाद 391 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे इंग्लंडला या डावात 27 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा जमवल्या आहेत. भारताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 61 धावांचं योगदान दिलं. त्याला चेतेश्वर पुजाराने 45 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून मार्क वूडने 3 तर मोईन अलीने 2 विकेट घेतल्या. दरम्यान अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा खेळ अर्धा तास आधी थांबवण्यात आला.

Key Events

इंग्लंडची भक्कम फलंदाजी

इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार रुटने सर्वाधिक 180 धावांचं योगदान दिलं. तो नाबाद राहिला. त्याला जॉनी बेअरस्टोने चांगली साथ दिली. बेअरस्टोने 57 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉनी बर्न्स याने काल 49 धावांची खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली होती. या सामन्यात भारतीय गोलंदाजीचा चांगलाच कस लागला. रुटव्यतिरिक्त कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी फार वेळ खेळपट्टीवर टिकू दिलं नाही. मात्र पुन्हा एकदा रुटने भारतीय गोलंदाजीची पिसं काढली.

रोहित-राहुलवर भारताची भिस्त

लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याचा निर्णय भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक फटकेबाजी करत 83 धावांची खेळी केली, तर राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही तो स्वस्तात बाद झाला. पुजारानंतर विराट (42), रिषभ पंत (37) आणि जाडेजाने (40) काही वेळ प्रतिकार केला. परंतु भरवशाचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या डावातही भारताची भिस्त रोहित-राहुल या जोडीवर असणार आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 15 Aug 2021 10:44 PM (IST)

    अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द

    अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचानी घेतला आहे. (181/6)

  • 15 Aug 2021 10:40 PM (IST)

    भारताचा सहावा गडी माघारी, रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद

    भारताने सहावी विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद. मोईन अलीने त्याला त्रिफळाचित केलं. (भारत 175/6)

  • 15 Aug 2021 10:27 PM (IST)

    अजिंक्य रहाणे पवेलियनमध्ये, 61 धावांवर बाद

    अजिंक्य रहाणे बाद झाला आहे.

    त्याने 146 चेंडूमध्ये एकूण  61 धावा केल्या.

  • 15 Aug 2021 09:55 PM (IST)

    भारताला चौथा झटका, चेतेश्वर पुजारा 45 धावांवर बाद

    भारताने आपली चौथी विकेट गमावली आहे. सुरुवातीपासून संयमी खेळ करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मार्क वूडने 45 धावांवर असताना जो रुटकरवी झेलबाद केलं. (155/4)

  • 15 Aug 2021 09:34 PM (IST)

    संघर्षपूर्ण स्थितीत अजिंक्य रहाणेचं अर्धशतक

    संघ अडचणीत असताना अजिक्यं रहाणेने अर्धशतक झळकावत या सामन्यातील भारताच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. 68 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर सॅम करनला शानदार चौकार लगावत रहाणेने अर्धशतक झळकावलं. अजिंक्यने 125 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा जमवल्या आहेत. (भारत 139/3)

  • 15 Aug 2021 08:41 PM (IST)

    तिसऱ्या सत्राचा खेळ सुरु, पुजारा-रहाणे जोडी मैदानात

    तिसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली आहे. चेतेश्वर पुजारा (29) आणि अजिंक्य रहाणे (24) या जोडी मैताात उतरली आहे. (भारत 15/3)

  • 15 Aug 2021 08:15 PM (IST)

    पुजारा-रहाणेचा संघर्ष, अर्धशतकीय भागीदारीसह भारताच्या 105 धावा

    कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला आहे. मात्र आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या जोडीने संघर्षपूर्ण अर्धशतकीय भागीदारी करत धावफलकावर भारताचं शतक झळकावलं आहे. त्यामुळे भारताला 78 धावांची आघाडी मिळाली आहे.

  • 15 Aug 2021 08:10 PM (IST)

    पुजारा-रहाणे जोडीची अर्धशतकी भागीदारी

    चेतेश्वर पुजारा (29) आणि अजिंक्य रहाणे (24) या जोडीने चौथ्या विकेटसाठी आतापर्यंत 175 चेंडूत 50 धावांची भागीदारी रचली आहे.

  • 15 Aug 2021 08:03 PM (IST)

    पुजाराचा चौकार, भारताचं शतक

    51 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सॅम करनच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावत चेतेश्वर पुजाराने धावफलकावर भारताचं शतक (103) झळकावलं आहे. त्यामुळे भारताला 76 धावांची आघाडीदेखील मिळाली आहे.

  • 15 Aug 2021 07:25 PM (IST)

    भारताला 50 धावांची आघाडी

    3 बाद 55 वरुन पुढे खेळणाऱ्या भारतीय संघाची स्थिती बिकट आहे. मात्र चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे इंग्लंडच्या गोलंदाजांचा प्रतिकार करत आहेत. या दोघांनी 98 चेंडूत 22 धावांची भागीदारी करत धावफळकावर 77 धावा लावल्या आहेत. त्यामुळे भारताला 50 धावांची आघाडी मिळाली आहे.

  • 15 Aug 2021 06:15 PM (IST)

    दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु, पुजारा-रहाणे जोडी मैदानात

    55 धावांमध्ये 3 विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला गेला आहे. लंचनंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या सत्राचा खेळ सुरु झाला आहे. पुजारा-रहाणे जोडी मैदानात परतली आहे.

  • 15 Aug 2021 05:35 PM (IST)

    पहिलं सत्र इंग्लंडचं, भारताचे तीन महत्वपूर्ण फलंदाज बाद

    चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. 25 षटकात त्यांनी भारताचे तीन महत्वपूर्ण फलंदाज (रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली) बाद करत केवळ 56 धावा दिल्या.

  • 15 Aug 2021 05:25 PM (IST)

    भारताला मोठा झटका, विराट कोहली 20 धावांवर बाद

    भारत या सामन्यात अडचणीत सापडला आहे. भारताने कर्णधार विराट कोहलीची महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. 20 धावांवर असताना सॅम करनने कोहलीला यष्टीरक्षक सॅम करनकरवी झेलबाद केलं. (भारत 55/3)

  • 15 Aug 2021 05:14 PM (IST)

    कोहलीचा आक्रमक पवित्रा, भारताचं अर्धशतक

    कर्णधार विराट कोहलीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 21 व्या षटकातील 5 व्या चेंडूवर रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावत कोहलीने धावफलकावर भारताचं अर्धशतक झळकावलं आहे. कोहलीने चार चौकारांच्या सहाय्याने 20 धावा फटकावल्या आहेत. (भारत 21 षटकात 3 बाद 52)

  • 15 Aug 2021 04:30 PM (IST)

    भारताला दुसरा झटका, रोहित शर्मा 21 धावांवर बाद

    भारताने दुसरी विकेट गमावली आहे. जलदगती गोलंदाज मार्क वूडने रोहितला सीमारेषेवर उभ्या मोईन अलीकरवी झेलबाद केलं. रोहितने 21 धावांचं योगदान दिलं. (भारत 27/2)

  • 15 Aug 2021 04:15 PM (IST)

    भारताला पहिला झटका, लोकेश राहुल 5 धावांवर बाद

    भारताने पहिली विकेट गमावली आहे. मार्क वूडने सलामीवीर लोकेश राहुलला 5 धावांवर असताना यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 18/1)

  • 15 Aug 2021 03:34 PM (IST)

    रोहित-राहुल जोडी मैदानात

    भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ही जोडी मैदानात उतरली आहे. इंग्लंडच्या कर्णधाराने चेंडू जेम्स अँडरसनच्या हाती सोपवला आहे.

Published On - Aug 15,2021 3:31 PM

Follow us
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.