India vs South Africa: पुढचे तीन दिवस महत्त्वाचे, हेड कोच राहुल द्रविड असं का म्हणाले?
फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांचीही कसोटी होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आव्हानात्मक होतं, असं गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितलं. "आम्ही सरावासाठी गेलो, त्यावेळी आम्हाला वाटलं स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. पण ढगाळ वातावरण होतं"
डरबन: सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर भारतीय फलंदाजांनी आज प्रतिकुल वातावरणात फलंदाजीचा सराव केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (India vs South Africa Test series) आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ नेटमध्ये सध्या जोरदार सराव करत आहे. सरावाचा आज दुसरा दिवस होता. दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये पहिला मालिका विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul dravid) यांनी नेटमध्ये खेळाडूंना दर्जेदार सराव आणि चांगला उत्साह दाखवण्याचा सल्ला दिला.
“पहिल्या कसोटीसाठी स्वत:ला सज्ज करण्यासाठी तयारीच्या दृष्टीने पुढचे तीन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत” असे राहुल द्रविडने सांगितले. बीसीसीआयने या तयारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. “आज ज्या वातावरणात, विकेटवर सराव केला, तिथे फलंदाजी करणं सोपं नव्हतं. फलंदाजांनी ज्या पद्धतीने सराव केला, त्याने मी खूपच आनंदी आहे” असे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सांगितले.
फलंदाजांप्रमाणे गोलंदाजांचीही कसोटी होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं आव्हानात्मक होतं, असं गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सांगितलं. “आम्ही सरावासाठी गेलो, त्यावेळी आम्हाला वाटलं स्वच्छ सूर्यप्रकाश असेल. पण ढगाळ वातावरण होतं. गोलंदाजांसाठी असं वातावरण आव्हानात्मक असतं. योग्य टप्यावर चेंडू टाकणं सोपं नसतं. तुम्हाला अशा वातावरणासाठी तयार असलं पाहिजे. कसोटी सामन्यांमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या वातावरणात खेळावं लागेल. तुम्हाला या वातावरणाचा फायदा उचलता आला पाहिजे” असं म्हांब्रे यांनी सांगितलं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामीने चांगली गोलंदाजी केली, असं वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सांगितलं.
#TeamIndia had an intense nets session ?? at SuperSport Park ?️ in the build up to the first #SAvIND Test.
Here’s @28anand taking you closer to all the action from Centurion. ? ?
Watch this special feature ? ?https://t.co/Dm6hVDz71w pic.twitter.com/qjxnBszmDa
— BCCI (@BCCI) December 20, 2021
16 डिसेंबरला भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला, तेव्हापासून टीम इंडिया इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे. कसोटीआधी भारतीय संघाला तयारीसाठी 10 दिवसांचा वेळ मिळाला आहे. यावर्षात झालेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळेच भारताला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात नमवता आले. दक्षिण आफ्रिकेतही तोच फॉर्म कायम राखण्याचा भारताचा प्रयत्न असेल. कसोटीच्या दोन्ही डावात मिळून 20 विकेट घेण्याचे लक्ष्य भारतीय गोलंदाजांसमोर असेल.
संबंधित बातम्या: VIDEO: आमदार, मंत्री झाला तरी पालिकेत जीव कसा घुटमळतोय, आता जीव मोकळा करा; महापौर किशोरी पेडणेकरांचा शेलारांवर हल्लाबोल हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात…देशाच्या जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न, राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल Tukaram Supe : तुकाराम सुपेंकडं घबाड सापडलं, मेव्हण्याच्या घरातून 2 कोटींसह सोनं पुणे पोलिसांकडून जप्त