IND vs SL 2nd T20 Live : अटीतटीच्या सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 4 विकेट्सने विजय, सीरिज 1-1 ने बरोबरीत
India vs Sri Lanka 1st T20 Live Score : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे.
India vs Srilanka : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरा टी 20 सामना प्रचंड रंगतदार झाला. अटीतटीच्या या सामन्यात श्रीलंकेने अखेर भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवत सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. श्रीलंकेकडून धनंजया डि सिल्वा याने सर्वाधिक नाबाद 40 धावा केल्या. सिल्वा याची खेळीच आजच्या सामन्यासाठी निर्णायक ठरली. सिल्वा पाठोपाठ बिनोद भानुका याने सर्वाधिक 36 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज कुलदीप यादव याने 2 तर भुवनेश्वर कुमार, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर यांनी प्रत्येक 1 विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे लंकेचे धनंजया डि सिल्वा आणि बिनोद भानुका यांच्या व्यतीरिक्त इतर मातब्बर फलंदाज फारसे तग धरु शकले नाहीत. पण रंगतदार झालेल्या या सामन्यात अंतिम समयी अखेर लंकेनेच बाजी मारली.
श्रीलंकेचा नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय
भारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (28 जुलै) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.
श्रीलंकेचा डाव
भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची फारसी चांगली सुरुवात झाली नाही. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर झेलबाद झाला. फर्नांडो याने 13 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर बिनोद भानुका आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वरुण चक्रवर्ती याने सदीरा याचा त्रिफळा उडवला. सदीरा याने 12 चेंडूत 8 धावा केल्या. त्यापाठोपाठ अवघ्या काही धावांच्या फरकावर दासुन शनाका कुलदीप यादवच्या बोलवर बाद झाला. दासुन याने फक्त 3 धावा केल्या.
त्यानंतर बिनोद भानुका कुलदीप यादवच्या बोलवर झेलबाद झाला. राहुल चहरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर धनंजय सिलवा याने वनिंदू हसरंगा याच्यासोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 15 व्या षटकात हसरंगा हा झेलबाद झाला. त्यानंतर अठराव्या षटकात रमेश मेंडिस हा देखील स्वस्तात म्हणजे अवघ्या दोन धावात बाद झाला. पण सामन्यात रंगत आली ती शेवटच्या दोन षटकात. सिल्वा याने चमिकाच्या मदतीने आपली वाटचाल सुरु ठेवली. अखेर 20 षटकाचे दोन बोल बाकी असताना श्रीलंकेने भारतावर विजय मिळवला.
भारताचा डाव
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. पण मोठी धावसंख्या उभारत असताना सलामीवीर ऋतुराज गायकवाड हा झेलबाद झाला. विशेष म्हणजे सलामीवीर म्हणून ऋतुराजचा हा पहिलाच सामना होता. त्याने 18 चेडूत 21 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. ऋतुराज बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल याने कर्णधार शिखर धवनसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजया याने 13 व्या षटकात शिखरचा त्रिफळा उडवला. शिखरने 42 चेंडूत 40 धावा केल्या.
शिखरनंतर देवदत्त 16 व्या षटकात बाद झाला. त्यापाठोपाठ सतराव्या षटकात संजू सॅमसन आणि नितीश राणा स्वस्तार तंबूत परतले. तर भुवनेश्वर कुमारने 11 चेंडूत 13 धावा केल्या. भारताने 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 132 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेपुढे 133 धावांचे आव्हान उभं राहिलं. श्रीलंकेकडून अकिला धनंजया यांनी दोन, तर वनिंदू हसरंगा, दासुन शनाका आणि दुश्मंता चमीरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
(India vs Sri Lanka T20 Series 2021 Live Score today India tour of Sri Lanka 2021 2nd T20 match scorecard in marathi)
Key Events
भारताचा खेळाडू कृणाल पांड्या याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर श्रीलंके विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एकदिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (28 जुलै) हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारताने 133 धावांचे आव्हान दिलं. या आव्हान श्रीलंकेने 4 गडी राखत पूर्ण केलं.
भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची फारसी चांगली सुरुवात झाली नाही. श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर झेलबाद झाला. फर्नांडो याने 13 चेंडूत 11 धावा केल्या. त्यानंतर बिनोद भानुका आणि सदीरा समरविक्रमा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण वरुण चक्रवर्ती याने सदीरा याचा त्रिफळा उडवला. सदीरा याने 12 चेंडूत 8 धावा केल्या. त्यापाठोपाठ अवघ्या काही धावांच्या फरकावर दासुन शनाका कुलदीप यादवच्या बोलवर बाद झाला. दासुन याने फक्त 3 धावा केल्या.
LIVE Cricket Score & Updates
-
श्रीलंकेचा दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर विजय
श्रीलंकेनं दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे. श्रीलंंकेनं हा सामना 4 विकेटस राखून जिंकला आहे. भारतानं दिलेलं 133 धावांचं लक्ष्य श्रीलंकेनं 19.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
-
श्रीलंकेला चौथा झटका, कर्णधार दासुन शनाका बाद
श्रीलंकेला तिसरा झटका, कर्णधार दासुन शनाका बाद, त्याने अवघ्या तीन धावा केल्या
-
-
श्रीलंकेला दुसरा झटका, समरविक्रमा बाद
श्रीलंकेला दुसरा झटका, समरविक्रमा बाद, त्याने 12 चेडूत 8 धावा केला
-
श्रीलंकेचा पहिला गडी बाद तंबूत, अविष्का फर्नांडो बाद
श्रीलंकेचा पहिला गडी बाद तंबूत, अविष्का फर्नांडो बाद, भुवनेश्वर कुमारच्या बोलवर उंच फटका मारण्या नादात तो झेलबाद झाला. राहुल चहरने ते कॅच पकडला. त्यामुळे फर्नांडो अवघ्या 11 धावांवर बाद झाला.
-
भारताच्या 20 षटकांत 132 धावा
भारताच्या 20 षटकांत 132 धावा
श्रीलंकेला 133 धावांचे लक्ष्य
-
-
भारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद
भारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद
नितीश राणाने केल्या 12 चेंडूत 9 धावा
-
भारताला चौथा झटका, संजू सॅमसन स्वस्तार तंबूत परतला
भारताला चौथा झटका, संजू सॅमसन स्वस्तार तंबूत परतला, संजने 13 चेंडूत अवघ्या 7 धावा केल्या
-
कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द
कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी
-
भारताला तिसरा झटका, देवदत्त बाद
भारताला तिसरा झटका, देवदत्त बाद, त्याने 23 चेंडूत 29 धावा केल्या
-
भारताला दुसरा झटका, शिखर धवन बाद
भारताला दुसरा झटका, शिखर धवन बाद, शिखरने 42 चेंडूत 40 धावा केल्या.
-
भारताला पहिला झटका, ऋतुराज झेलबाद
भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उंच फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 21 धावा केल्या. यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे.
-
IND vs SL : शिखर आणि ऋतुराज गायकवाड सलामीला
भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या टी-20 सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताकडे पहिली फलंदाजी आली असून शिखर धवनसह भारतीय संघात पदार्पण करणारा ऋतुराज मैदानात उतरला आहे.
-
IND vs SL : श्रीलंका संघातही दोन बदल
श्रीलंका संघाकडून रमेश मेंडिस डेब्यू करत असून सदीरा समरविक्रमा यालाही संघात स्थान मिळालं आहे. अशेन बंडारा याला संघातून बाहेर ठेवले असून चरित असांलका दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.
Two changes for ??
Sadeera Samarawickrama and Ramesh Mendis IN for Charith Asalanka, A Bandara.#SLvIND pic.twitter.com/RoM9BMkxXN
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) July 28, 2021
-
IND vs SL : श्रीलंका संघाचा गोलंदाजीचा निर्णय
श्रीलंका संघाचा कर्णधार दासुन शनाकाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. श्रीलंका संघातून रमेश मेंडिस डेब्यू करत आहे. भारतीय कर्णधार शिखर धवचच्या मते त्यांना फलंदाजीच हवी होती.
-
IND vs SL – भारताचा संघ जाहीर
दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी भारताकडून देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितिश राणासह चेतन साकरिया डेब्यू करत आहेत.
Hello & Good Evening from Colombo ?
Sri Lanka have elected to bowl against #TeamIndia in the 2⃣nd #SLvIND T20I.
Follow the match ? https://t.co/Hsbf9yWCCh
Here’s India’s Playing XI ? pic.twitter.com/yqyeobUxuu
— BCCI (@BCCI) July 28, 2021
Published On - Jul 28,2021 7:44 PM