IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली

| Updated on: Jul 29, 2021 | 11:37 PM

टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेला (Sri Lanka) विजयासाठी 82 धावांचे माफक आव्हान दिले होते.

IND vs SL 3rd T20 Live : श्रीलंकेचा भारतावर दणदणीत विजय, टीम इंडियानं टी-20 मालिका गमावली
भारत विरुद्ध श्रीलंका

कोलंबो (श्रीलंका) : टीम इंडियाने दिलेल्या 82 धावांच्या माफक आव्हानाला श्रीलंकेच्या संघाने 7 गडी राखत सहज पूर्ण केलं आहे. या विजयासह श्रीलंकेने टी 20 मालिकाही 1-2 च्या फरकाने खिशात घातली आहे. श्रीलंकेककडून आजदेखील धनंजया डि सिल्वा याने सर्वाधिक नाबाद 23 धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ मिनोद भानुका याने 18 धावा केल्या. श्रीलंकेच्या या विजयात गोलंदाजांचा वाटा मोठा आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय फलंदाज मैदानावर फार काळ तग धरु शकले नाहीत. श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने एकट्याने आज सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनाका याने दोन तर दुश्मंथा चमिरा, रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन बाद झाल्यानंतर काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा वरच्या आणि मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. अखेर 20 षटकात टीम इंडियाने 8 बाद 81 धावा केल्या. श्रीलंकेनं हे लक्ष्य 15 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. श्रीलंकेनं 3 विकेट गमावून हे टीम इंडियावर विजय मिळवला. भारताकडून चहरनं 3 विकेट घेतल्या.

भारताचा डाव

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. भारताचा कर्णधार पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूत झेलबाद झाला. त्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. श्रीलंकेचा गोलंदाज चमिराच्या बोलवर तो झेलबाद झाला. शिखर ऋतुराज सोबत मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा होती. पण या आशेवर अखेर पाणी फेरलं.

शिखर बाद झाल्यानंतर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड बाद झाले. भारतासाठी हे मोठे धक्के होते. त्यानंतर नितीश राणा नवव्या षयकात बाद झाला. या दरम्यान भुवनेश्वर कुमार याने कुलदीप यादवच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अखेर तो देखील श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याचा शिकार झाला आणि झेलबाद झाला. भुवनेश्वर नंतर 16 व्या षटकात राहुल चहर आणि 17 व्या षटकात वरुण चक्रवर्ती बाद झाला. त्यानंतर चेतन साकरियाच्या मदतनी कुलदीप यादवने 20 षटकात 81 केल्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Jul 2021 11:03 PM (IST)

    टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली

    श्रीलंकेनं भारतीय संघाला 81 धावांवर रोखल्यानंतर 7 विकेटसनं विजय मिळवला आहे. तीन विकेटसवर श्रीलकेनं टीम इंडियावर विजय मिळवला आहे. यामुळे श्रीलंकेनं ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे

  • 29 Jul 2021 10:30 PM (IST)

    श्रीलंकेला दुसरा झटका, मिनोद भानुका पायचित

    श्रीलंकेला दुसरा झटका, मिनोद भानुका बाद झाला

  • 29 Jul 2021 10:25 PM (IST)

    श्रीलंकेला सलामीवीर अविष्का बाद

    श्रीलंकेला सलामीवीर अविष्का बाद, त्याने 18 चेंडूत 12 धावा केल्या

  • 29 Jul 2021 09:47 PM (IST)

    श्रीलंकेच्या डावाला सुरुवात, सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका मैदानात

    श्रीलंकेच्या डावाला सुरुवात, सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका मैदानात

  • 29 Jul 2021 09:33 PM (IST)

    कर्णधार शिखर धवनसह भारताचे तीन फलंदाज शुन्यावर बाद, 20 षटकात भारताचे 8 बाद 81 धावा

    भारताचा डाव अखेर संपला आहे. भारताने 20 षटकांत 8 गडी गमावत 81 धावा केल्या आहेत.

  • 29 Jul 2021 09:15 PM (IST)

    भारताला आठवा झटका, वरुण चक्रवर्ती झेलबाद

    भारताला आठवा झटका, वरुण चक्रवर्ती झेलबाद

  • 29 Jul 2021 09:10 PM (IST)

    भारताला सातवा झटका, राहुल चहर तंबूत परतला

    भारताला सातवा झटका, राहुल चहर तंबूत परतला, अवघ्या 62 धावांवर भारताचे सात गडी तंबूत

  • 29 Jul 2021 09:04 PM (IST)

    भारताला सहावा झटका, भुवनेश्वर कुमार झेलबाद

    भारताला सहावा झटका, भुवनेश्वर कुमार झेलबाद

  • 29 Jul 2021 08:43 PM (IST)

    भारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद

    भारताला पाचवा झटका, नितीश राणा बाद, अवघ्या 36 धावांमध्ये भारताचे पाच गडी तंबूत

  • 29 Jul 2021 08:34 PM (IST)

    अवघ्या 25 धावांमध्ये भारताचे 4 गडी तंबूत

    तिसऱ्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय आता चुकीचा ठरु शकतो. कारण अवघ्या 25 धावांमध्ये टीम इंडियाचे चार फलंदाज तंबूत परतले आहे. विशेष म्हणजे पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूत कर्णधार शिखर धवन झेलबाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकात संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाड बाद झाले.

  • 29 Jul 2021 08:28 PM (IST)

    भारताला चौथा झटका, ऋतुराज गायकवाड बाद, टीम इंडियावर दबाव वाढला

    भारताला चौथा झटका, ऋतुराज गायकवाड बाद, टीम इंडियावर दबाव वाढला.

  • 29 Jul 2021 08:24 PM (IST)

    धक्क्यावर धक्के सुरुच, संजू सॅमसन पायचित, टीम इंडियावर दबाव वाढला

    देवदत्त बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने संजू सॅमसनचा बळी घेतला.

  • 29 Jul 2021 08:21 PM (IST)

    धक्क्यावर धक्के सुरुच, देवदत्त तंबूत परतला, टीम इंडियावर दबाव वाढला

    धक्क्यावर धक्के सुरुच, देवदत्त तंबूत परतला, टीम इंडियावर दबाव वाढला

  • 29 Jul 2021 08:03 PM (IST)

    भारताला पहिला झटका, शिखर धवन बाद

    सलामीसाठी आलेला कर्णधार शिखर धवन पहिल्याच षटकात बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला आहे. श्रीलंकेचा गोलंदाज चमिराच्या बोलवर तो झेलबाद झाला. शिखर ऋतुराज सोबत मोठी धावसंख्या उभारेल अशी आशा होती. पण या आशेवर अखेर पाणी फेरलं आहे. याशिवाय गब्बरची विकेट गेल्याने भारतीय संघावरील प्रेशर आता वाढलं आहे.

  • 29 Jul 2021 08:02 PM (IST)

    भारताच्या फलंदाजीला सुरुवात

    भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे. भारताकडून सलामीसाठी ऋुतुराज आणि शिखर धवन आले आहेत.

  • 29 Jul 2021 07:47 PM (IST)

    भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

    नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

    भारतीय संघ :

    शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितीश राणा, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), कुलदीप यादव, राहुल चहर, संदीप वारियर, चेतन साकारिया, वरुण चक्रवर्ती

    श्रीलंकेचा संघ :

    अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका, धनंजय डि सिल्वा, पथुम निसांका, वानिदू हसरंगा, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, रमेश मेंडिस, अकिला धनंजया, दुश्मंथा चमिरा, सदिरा समरविक्रमा

Published On - Jul 29,2021 7:46 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.