South Africa vs India: अजिंक्य रहाणेला संधी देण्याबद्दल वसीम जाफर म्हणतो….
रहाणेची सरासरी घसरली असून मागच्या 12 कसोटी सामन्यात त्याने 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. अलीकडेच रहाणेला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आले.
मुंबई: अनुभव आणि दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी लक्षात घेऊन अजिंक्य रहाणेला पहिल्या कसोटी सामन्यात संधी दिली पाहिजे, असं मत भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर यांनी व्यक्त केलं आहे. अजिंक्य रहाणे सध्या फॉर्ममध्ये नाहीय. पण दक्षिण आफ्रिकेत 53 च्या सरासरीने त्याने धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले आहेत. दोन अर्धशतकासह 266 धावा केल्या आहेत.
रहाणेची सरासरी घसरली असून मागच्या 12 कसोटी सामन्यात त्याने 19.57 च्या सरासरीने 411 धावा केल्या आहेत. अलीकडेच रहाणेला कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळणार की, नाही यावर सध्या चर्चा सुरु आहे. जाफरचा रहाणे आणि पूजारा दोघांना पाठिंबा आहे. चेतेश्वर पूजाराचा सुद्धा सध्या फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे.
अजिंक्य रहाणेवरुन बरीच चर्चा झाली आहे. त्याला खेळवायचे की, नाही यावर वेगवेगळी मत व्यक्त होत आहेत. हनुमा विहारी संधीच्या प्रतिक्षेत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उद्यापासून दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. मागच्या 29 वर्षात भारताने सात वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. पण त्यांना एकदाही कसोटी मालिकेत विजय मिळवता आलेला नाही.
संबंधित बातम्या:
अनिल परब यांना सीबीआयचं समन्स, अनिल परबांनी एक महिन्याची वेळ मागितल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी Omicron cases: महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन परततोय, कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; नव्या वर्षात बाहेर जाण्याचा विचार करताय तर हे नियम वाचा