स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास….

यावर्षी जानेवारी महिन्यातही तिने स्मिथचा हॉटेल रुममधील असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. स्मिथच्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलियन संघाने सध्या इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं आहे.

स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास....
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 11:08 AM

मेलबर्न: सध्या सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes series) स्टीव्ह स्मिथ (Steve smith) कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 93 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चतुराईने बदल करत इंग्लंडला (Eng vs Aus) बॅकफूटवर ढकललं आहे. तब्बल तीन वर्षानंतर स्मिथला ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली आहे. कर्णधार म्हणून चोख कामगिरी करणारा स्मिथ हॉटेल रुममध्येही शांत बसत नाही. मध्यरात्री सुद्धा त्याचं क्रिकेट सुरु असतं.

स्मिथची पत्नी दानी विलिसने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये स्मिथ मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेल रुममध्ये शॅडो बॅटिंगचा सराव करताना दिसतो. खरंतर स्मिथ त्याची नवीन बॅट चेक करत होता. स्मिथचं हे क्रिकेटप्रेम दानीने पहिल्यांदा अनुभवलेलं नाही. यावर्षी जानेवारी महिन्यातही तिने स्मिथचा हॉटेल रुममधील असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये स्मिथ क्रिकेटचा व्हाईट पोषाख घालून हॉटेल रुममध्ये बॅटिंगची प्रॅक्टिस करत होता.

स्मिथच्या नेतृत्वाखील ऑस्ट्रेलियन संघाने सध्या इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं असून कसोटीवर वर्चस्व गाजवत आहे. आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाकडे 290 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीमध्ये असून सामना जिंकला, तर मालिकेत आघाडी वाढवता येईल. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना आधीच जिंकला आहे. अ‍ॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखं महत्त्व आहे. दोन्ही संघ विजयासाठी जिवाचे रान करतात.

ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याला आयसोलेट व्हावे लागले. त्याच्याजागी स्मिथला कर्णधारपदाची संधी मिळाली. पहिल्या डावात 93 धावांची खेळी करताना स्लीपमध्ये दोन झेल घेतले. इंग्लंडचा पहिला डाव 236 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणामुळे स्मिथला 2018 साली कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या: Gulabrao Patil: मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केले, विरोधकांनी येऊन पाहावं, गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंना डिवचलं देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा, पंकजा मुंडेंकडून भरसभेत कौतुक; दरी मिटणार? अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.