Asian Championship: हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले हिरो

जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्राच्या खेळात भारताने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

Asian Championship: हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले हिरो
(Twitter/Hockey India)
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 6:04 PM

ढाका : बांगलादेशात ढाका येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (Asian Champions Trophy hockey) भारताच्या पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानवर (Pakistan) दणदणीत विजयाची नोंद केली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीत सिंग (Harmanpreet Singh) आणि आकाशदीप सिंग (Akashdeep Singh) यांच्या गोलच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ३-१ ने विजय मिळवला.

या स्पर्धेत तीन सामन्यातील सात गुणांसह भारतीय हॉकी संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. याआधी झालेल्या दोन सामन्यात भारताची दक्षिण कोरिया विरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर भारताने बांगलादेशवर ९-० अशी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. टोक्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने कास्यपदक विजेती कामगिरी केली होती.

जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकी संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सत्राच्या खेळात भारताने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतने थेट चेंडूला गोलपोस्टची दिशा दाखवत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्राच्या खेळात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत परस्परांवर हल्ले चढवले. पण यश कोणालाही मिळाले नाही. तिसऱ्या सत्रात अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारतीय संघाने आक्रमक चाली करत पाकिस्तानवर दबाव वाढवला. सुमीत कुमारकडून मिळालेल्या सुंदर पासवर आकाशदीप सिंगने चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवून आघाडी २-० ने वाढवली. पण त्यानंतर पाकिस्तानने सुद्धा एक गोल केला. सामना संपायला सात मिनिटे बाकी असताना भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगने कुठलीही चूक न करताना चेंडूला गोलपोस्टमध्ये पाठवून भारताची आघाडी ३-१ ने वाढवली.

संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.