खेलरत्न पुरस्काराला हॉकीच्या जादूगाराचं नाव, का होतेय मोदींच्या निर्णयाचं कौतुक? वाचा 5 कारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. या पुरस्काराला त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं आहे. (Rajiv Gandhi Khelratna Award)

खेलरत्न पुरस्काराला हॉकीच्या जादूगाराचं नाव, का होतेय मोदींच्या निर्णयाचं कौतुक? वाचा 5 कारणे
narendra modi
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 5:29 PM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं आहे. या पुरस्काराला त्यांनी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं आहे. त्यामुळे मोदींच्या या निर्णयाचं देशभरातून कौतुक होत आहे. मोदी सरकारने हा निर्णय का घेतला? यामागची कारणं काय आहेत? याबाबतचा घेतलेला हा आढावा. (Netizens thank PM Modi for renaming Khel Ratna Award after Major Dhyan Chand)

सर्वोच्च पुरस्काराला नेत्याचं नाव का?

राजीव गांधी हे देशाचे माजी पंतप्रधान आहेत. आधुनिकतेचे पुरस्कर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांनी पंतप्रधान असतात देशांतर्गत आणि राष्ट्रीय खेळांना मोठं प्रोत्साहन दिलं होतं. तरुणांना खेळांकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 1991-92मध्ये या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पहिला पुरस्कार ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला. आतापर्यंत 45 जणांना हा पुरस्कार देण्यता आला आहे. त्यात धनराज पिल्ले, सरदार सिंह आणि राणी रामपाल यांचा समावेश आहे.

सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार, सर्वोच्च खेळाडूचं नाव

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा देशातील सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे. विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्य दाखविणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. राजीव गांधी यांचं नाव या पुरस्काराला देण्यातआलं होतं. हा पुरस्कार खेळाडूंच्याच नावाने दिला जावा असा एक मतप्रवाह होता. त्यातही हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यामुळे मोदी सरकारने ध्यानचंद यांचं नाव या पुरस्काराला दिलं आहे. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांनी तीनवेळा भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. ते जेव्हा खेळायचे तेव्हा त्यांच्या हॉकीला चुंबक लावलं असावं असं सर्वांना वाटायचं. त्यामुळे एकदा तर त्यांची हॉकी तोडण्यातही आली होती.

मेजर ध्यानचंद सर्वमान्य नाव

मेजर ध्यानचंद यांचं नाव सर्वमान्य असंच आहे. ध्यानचंद हे देशातील सर्वात लोकप्रिय आणि स्पोर्टिंग आयकॉन आहेत. त्यामुळेच खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. ध्यानचंद यांचं आयुष्य आणि त्यांचं यश खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहित करत आलं आहे. शिवाय खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्काराला ध्यानचंद यांचं नाव देण्याची अनेक वर्षांपासून मागणीही होत होती.

काँग्रेस विरोधही करू शकत नाही

या पुरस्काराला ध्यानचंद यांचं नाव देण्यात आल्याने काँग्रेसकडून सावध प्रतिक्रिया येत आहे. खेलरत्न पुरस्कारातून राजीव गांधी यांचं नाव काढल्याने काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, ही प्रतिक्रिया देताना काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. ध्यानचंद यांच्या बाबत काँग्रेसने एक शब्दही व्यक्त केलेला नाही. ध्यानचंद यांचं हॉकीसाठीचं योगदान काँग्रेसही जाणून आहे. भाजपला देशाचं भगवाकरण करायचं आहे. त्यामुळेच त्यांनी या पुरस्काराचं नाव बदललंय, असा आरोप काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी केला आहे. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरू-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हॉकी राष्ट्रीय खेळ

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. भारतात ब्रिटिश सेना आणि रेजीमेंटमध्ये हा खेळ खेळला जात होता. सुरुवातीला इंग्रजच हा खेळ खेळत होते. मात्र, नंतर भारतीयांनाही या खेळाबद्दल रुची निर्माण झाली आणि भारतीयांनी या खेळास सुरुवात केली. 1928 मध्ये पहिली पुरुष हॉकी टीम तयार झाली. आंतरराष्ट्रीय हॉकी संघातील पहिला गैर यूरोपीय सदस्य संघ होता. 1928पासूनच भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याच वर्षी म्हणजे 1928 मध्ये भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं. 1956 पर्यंत सुवर्णपदक जिंकण्याचा हा सिलसिला सुरू होता. या काळात भारताने एकूण सहा सुवर्णपदकं जिंकले. 1928 ते 1956 हा भारतीय हॉकी संघाचा सुवर्ण काळ असल्याचं मानलं जातं. भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्णपदकं जिंकली आहेत. हा विक्रम अबाधित असून कोणत्याही देशाच्या हॉकी संघाने हा विक्रम अद्याप मोडलेला नाही. या शिवाय भारताने आशिया खेळात हॉकीमध्ये तीन सुवर्णपदके जिंकली आहेत. (Netizens thank PM Modi for renaming Khel Ratna Award after Major Dhyan Chand)

संबंधित बातम्या:

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?

Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार!

Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघातील हरयाणाच्या खेळाडूंना बक्षिस, प्रत्येकी 50 लाख रुपये देऊन होणार सन्मान

(Netizens thank PM Modi for renaming Khel Ratna Award after Major Dhyan Chand)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.