Pro Kabaddi League PKL 2021-22: दिल्लीची नवीन एक्स्प्रेस सुसाट, पुण्याचा पराभव

पुण्याकडून नितीन तोमर आणि राहुल चौधरी हे चमकार कामगिरी करु शकले नाहीत. दोन्ही संघांनी पकडीपेक्षा आक्रमणात जास्त गुण मिळवले.

Pro Kabaddi League PKL 2021-22: दिल्लीची नवीन एक्स्प्रेस सुसाट, पुण्याचा पराभव
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 9:52 PM

बंगळुरु: प्रो कबड्डी लीगमध्ये (Pro Kabaddi League) दबंग दिल्ली (Dabang Delhi) आणि पुणेरी पलटनमध्ये (Puneri Paltan) दिवसातील दुसरा सामना झाला. दबंग दिल्लीने या सामन्यात दमदार खेळ दाखवत पुण्याला 41-30 असे अकरा गुणांनी पराभूत केले. दिल्लीने अत्यंत सहजतेने पुण्यावर विजय मिळवला. दिल्लीकडून नवीन कुमारने शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. जवळपास प्रत्येक रेड म्हणजे चढाईमध्ये त्याने दबंग दिल्लीसाठी गुण मिळवले.

रेडमध्ये नवीन कुमारने 14 पॉईंट मिळवले. विजय मलिकने रेड मध्ये सहा पॉईंट मिळवून त्याला चांगली साथ दिली. नवीन कुमारने अत्यंत चपळाईने आक्रमण करुन गुण मिळवले. पुण्याकडून नितीन तोमर आणि राहुल चौधरी हे चमकार कामगिरी करु शकले नाहीत. दोन्ही संघांनी पकडीपेक्षा आक्रमणात जास्त गुण मिळवले.

पहिल्या हाफचा खेळ संपला, त्यावेळी दिल्लीकडे सात गुणांची आघाडी होती. दिल्लीचे 22 तर पुण्याचे 15 गुण झाले होते. रेड म्हणजे चढाईत दिल्लीने 13 तर पुण्याने चढाईत 11 गुण मिळवले होते. दिल्ली विरुद्ध पुणे सामना अगदीच एकतर्फी झाला. काही प्रसंगी पुणे सामन्यात कमबॅक करतय असं वाटलं. पण दिल्लीने पुण्याला वरचढ होण्याची संधी दिली नाही.

संबंधित बातम्या:

Pro Kabaddi League PKL 2021-22: मोक्याच्याक्षणी गुजरातने सामना फिरवला, अभिषेकच्या जयपूरचा पराभव

IPL 2022 Mega Auction: लिलावाची तारीख ठरली, बंगळुरुत ‘या’ दिवशी जमणार संघ मालक

IPL 2022: ब्रायन लारा आणि डेल स्टेनने IPL मधील ‘या’ संघाच्या प्रशिक्षकपदाची स्वीकारली जबाबदारी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.