Pro Kabaddi League PKL 2021-22: कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय

Pro Kabaddi League PKL 2021-22: पुणेरी पलटनने टॅकल म्हणजे पकडीत तेलगु टायटन्सपेक्षा सरस कामगिरी केली. पुणेरी पलटनने रेडमध्ये 13 तर टायटन्सनी आठ पॉईंटस मिळवले.

Pro Kabaddi League PKL 2021-22: कोल्हापूरच्या सिद्धार्थची अपयशी झुंज, पुण्याचा पहिला विजय
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 10:16 PM

बेंगळुरु: शेवटच्या सेकंदापर्यंत थरारक ठरलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने बाहुबली तेलगु टायटन्सवर एका गुणाच्या फरकाने 34-33 असा विजय मिळवला. तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईने एकाकी झुंज दिली. त्याने रेडमध्ये 15 असे एकूण 18 पॉईंटस मिळवले.

अंकित बेनिवालच्या एका रेडचा अपवाद वगळता तेलगु टायटन्सकडून सिद्धार्थ देसाईनेच रेडसमध्ये पॉईंटस मिळवून दिले. पुणेरी पलटनने टॅकल म्हणजे पकडीत तेलगु टायटन्सपेक्षा सरस कामगिरी केली. पुणेरी पलटनने रेडमध्ये 13 तर टायटन्सनी आठ पॉईंटस मिळवले. त्याशिवाय पुण्याकडून मोहित गोएत यशस्वी रेडर ठरला. त्याने सात पॉईंटस मिळवले.

पहिला हाफ पुणेरी पलटन आणि तेलगु टायटन्समध्ये रंगतदार सामना सुरु आहे. पहिल्या हाफमध्ये तेलगु टायन्सकडे 20-14 अशी सहा पॉईंटसची आघाडी होती. सुरुवातीपासून पुण्याने चांगली लढत दिली होती. पण शेवटच्या तीन चार मिनिटात तेलगु टायटन्सने आपला खेळ उंचावला व पुणेरी पलटनवर सहा पॉईंटसचा लीड घेतला. तेलगु टायटन्सचा स्टार सिद्धार्थ देसाईने 10 यशस्वी रेड करत 11 पॉईंटस मिळवलेत.

संबंधित बातम्या:

Pro Kabaddi League PKL 2021-22: फक्त एका पॉईंटने प्रदीप नरवालच्या यूपी योद्धाची पटनावर मात Narendra Modi | भाजपला मोदींनी दिले 1000/- रुपये, देणगीची पावती शेअर करत मोदी म्हणाले… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन, काय म्हणाले मोदी? वाचा सविस्तर

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.