AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीरज चोप्रामुळे चर्चेत आलेले रोड मराठे नेमके कोण आहेत?; काय आहे पानिपतशी नेमकं नातं?

भारताला एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौतुक होत असतानाच त्याच्या जातीवरही चर्चा होताना दिसत आहे. (who is rod marathas?, know history of name and Panipat Battle)

नीरज चोप्रामुळे चर्चेत आलेले रोड मराठे नेमके कोण आहेत?; काय आहे पानिपतशी नेमकं नातं?
neeraj chopra
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 12:29 PM
Share

नवी दिल्ली: भारताला एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौतुक होत असतानाच त्याच्या जातीवरही चर्चा होताना दिसत आहे. नीरज चोप्रा हा रोड मराठा असून त्यांचं पानिपतशी नातं असल्याचं म्हटलं जात आहे. रोड मराठे नेमके कोण आहेत? पानिपतशी त्यांचं नेमकं काय नातं आहे? यावर टाकलेला हा प्रकाश. (who is rod marathas?, know history of name and Panipat Battle)

1761मध्ये नीरज चोप्राचे पूर्वज पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याबाजूने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात उतरले होते. अफगानचा शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धानंतर नीरजचे पूर्वज पानिपतमध्येच थांबले.

पानिपतची कहाणी काय होती?

पानिपतचं युद्ध हे एक निर्णायक युद्ध होतं. या युद्धात आप्तस्वकीयांनी अब्दालीला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला. या पराभवामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. पण हिंदुस्थानावर राज्य कोम करेल हे अजूनही ठरलं नव्हतं, असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे. त्याकाळात इंग्रजांचीही ताकद वाढलेली होती. ते देशभर पसरले होते. मोगलांचं साम्राज्य लयाला जाण्याचा हा काळ होता. देशात मराठ्यांची ताकद मोठी होती. त्यामुळे मोगल गेल्यानंतर देशावर मराठ्यांचंच राज्य येईल हे निश्चित होतं. मात्र पानिपताच्या पराभववामुळे मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर दुसरीकडे इंग्रजांनी उचल खाल्ली होती. अब्दालीने पानिपतनंतर लुटमार आणि रक्तपात घडवून आणला. त्यानंतर तो अफगाणिस्तानला गेला. आणि हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला, असं इतिहासकार सांगतात.

रोड राजाच्या नावाने नवी ओळख

14 जानेवारी 1761मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. सुमारे 50 हजार मराठा जवानांना या युद्धात वीर मरण आलं. या युद्धानंतर काही सैनिक पळून गेले. काही जण याच भागात लपून राहिले. काहींनी आपली ओळख लपवली. मात्र, ओळखू जाऊ नये म्हणून त्यांनी येथील रोड नावाच्या राजाच्या नावाने स्वत:ची ओळख सांगण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पानिपतमध्ये पराभूत झालेल्या आणि याच परिसरात राहिलेल्यांना रोड मराठा म्हणून संबोधलं जाऊ लागलं, असं इतिहासकार सांगतात.

भाषेवर मराठीचा प्रभाव

या रोड मराठ्यांना आपलं मूळ माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या प्रथा आणि परंपरांचं जतन केलं. म्हणूनच आजही रोड मराठ्यांच्या परंपरा आणि महाराष्ट्रातील प्रथा, परंपरा समान दिसतात. हे रोड मराठा हिंदी बोलतात. पण त्यांच्या बोलण्यात अधूनमधून मराठी शब्द डोकावत असतात. आईन-ए-अकबरीमध्ये रोड मराठ्यांचा उल्लेख नाही. त्यांचा संदर्भ पानिपतानंतरच्या बखरींमधून आढळून येतो.

लोकसंख्या किती?

रोड मराठा प्रामुख्याने पानिपत, करनाल, सोनीपत, कॅथल आणि रोहतक परिसरात राहतात. रोड मराठ्यांची ठोस आकडेवारी पुढे आलेली नाही. मात्र, त्यांची संख्या सहा ते आठ लाख असावी असं सांगितलं जातं. (who is rod marathas?, know history of name and Panipat Battle)

संबंधित बातम्या:

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

‘हा खेळांचा कुंभमेळा होता, चौथ्या स्थानावर राहून खूश कसं राहू?’, पदकाने हुलकावणी दिल्याने आदिती भावूक

(who is rod marathas?, know history of name and Panipat Battle)

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.