Apple दिवाळीनंतर देणार गिफ्ट, ‘या’ iPhone साठी खास ‘सर्व्हिस प्रोग्राम’

iPhone 14 Plus Camera: तुम्ही iPhone युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. सध्या दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांवर सर्वत्र एकापेक्षा एक धमाकेदार ऑफर्स दिल्या जात आहेत. दिवाळी किंवा सण-उत्सव म्हणलं की वेगवेगळ्या प्रोडक्टवर ऑफर्स दिल्या जातात किंवा गिफ्ट देतातच. पण, आता Apple दिवाळीनंतरही युजर्सला गिफ्ट देणार आहे. आता हे गिफ्ट नेमकं काय असणार, याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

Apple दिवाळीनंतर देणार गिफ्ट, ‘या’ iPhone साठी खास ‘सर्व्हिस प्रोग्राम’
iPhone 14 PlusImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 1:05 PM

iPhone 14 Plus Camera: दिवाळीत किंवा सण-उत्सवात गिफ्ट अनेक कंपन्या ऑफर करतात. पण, आता Apple दिवाळीनंतरही गिफ्ट देणार आहे. Apple ने एक सर्व्हिस प्रोग्रॅम सुरू केला आहे. हा सर्व्हिस प्रोग्रॅम iPhone 14 Plus युजर्सना सेवा मोफत देणार आहे. दिवाळीनंतर लगेचच सुरू करण्यात आलेल्या या सर्व्हिस प्रोग्रॅमविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

आता iPhone म्हणलं की अर्थातच महाग. त्यातही काही दुस्ती निघाली की तो खर्च वेगळा आलाच. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण, आता Apple कंपनी तुमच्या मोबाईलच्या दुरुस्तीचा खर्च उचलणार आहे. आता तुमच्या iPhone मध्ये त्रुटी असेल तर त्यासाठी Apple ने खास सर्व्हिस प्रोग्राम लॉन्च केला आहे.

चला आता थेट Apple कंपनीने आणलेल्या दिवाळीनंतरच्या सर्व्हिस प्रोगामविषयीच बोलूया. iPhone 14 च्या निवडक मॉडेल्सच्या रिअर कॅमेऱ्याची कोणतीही समस्या आता मोफत दूर करण्यासाठी Apple ने एक नवीन सर्व्हिस प्रोग्रॅम लॉन्च केला आहे. iPhone 14 Plus च्या काही मॉडेल्समध्ये रियर कॅमेरा प्रिव्ह्यू दिसत नाही. आता ज्या iPhone 14 Plus युजर्सना या समस्या येत आहे, त्यांच्यासाठी Apple ने हा खास प्रोगॅम लॉन्च केला आहे.

iPhone 14 Plus फ्री कसा दुरुस्त करावा?

तुम्ही iPhone 14 Plus युजर्स असाल आणि बॅक कॅमेऱ्याच्या समस्येला तोंड देत असाल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. कारण, तुमचा iPhone फ्री दुरुस्त होऊ शकतो. आधी तुम्ही Apple सर्व्हिस प्रोग्राममध्ये पात्र आहे की नाही, हे तपासायला हवं. हे तपासण्यासाठी तुम्हाला Apple च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. इथे अॅपल सर्व्हिस प्रोग्राम, हा पर्याय दिसेल. याठिकाणी क्लिक करून तुम्ही iPhone चा सीरियल नंबर टाका. आता तुम्हाल कळेल की, तुम्ही Apple सर्व्हिस प्रोग्रामसाठी पात्र आहात की नाही.

iPhone 14 Plus दुरुस्त कुठे करणार?

iPhone 14 Plus च्या रिअर कॅमेऱ्यात काही प्रॉब्लेम असल्याची खात्री पटली आणि इतर कोणत्याही प्रकारे फोन खराब झाला नसेल तर कंपनी तुमचा मोफत दुरुस्त करेल. Apple रिटेल स्टोअर किंवा Apple रिपेअर सेंटरमध्ये जाऊन या सेवेचा लाभ घेता येईल.

तीन वर्षांसाठी कव्हर

तुम्हाला हे माहिती असायला हवं की, Apple कंपनीने आश्वासन दिलं आहे की, हा Apple सर्व्हिस प्रोग्रॅम पात्र मॉडेल्सला त्यांच्या मूळ खरेदी तारखेनंतर तीन वर्षांसाठी कव्हर करेल. ज्यांनी रिअर कॅमेऱ्याच्या या विशिष्ट समस्येशी संबंधित दुरुस्तीसाठी पैसे दिले आहेत. त्यांच्या विनंतीनुसार पैसे परत दिले जातील.

iPhone 14 Plus सप्टेंबर 2022 मध्ये लॉन्च झाला. त्यावेळी रियर कॅमेऱ्यात कोणतीही अडचण नव्हती. पण काही काळ उलटून गेल्यानंतर त्यातील बिघाड समोर येऊ लागले आहेत.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.