VIDEO : पीव्ही सिंधूचा ‘Love Nwantinti’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ!

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या स्टार खेळाडूचा हा नवा लूक पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. सिंधूचा हा व्हिडिओ दिवाळी सेलिब्रेशनचा आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO : पीव्ही सिंधूचा ‘Love Nwantinti’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ!
डान्स व्हिडीओ
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 10:26 AM

मुंबई : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या आवडत्या स्टार खेळाडूचा हा नवा लूक पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. सिंधूचा हा व्हिडिओ दिवाळी सेलिब्रेशनचा आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांनी सिंधूचे कौतुक देखील केले आहे.

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सीकेच्या ‘Love Nwantiti’ या गाण्यावर डान्स केला. या व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधूने ग्रीन कलरचा कांजीवरम लेहेंगा घातला आहे. व्हिडिओमधील सिंधूचा लूक जबरदस्त दिसत आहे. व्हिडिओसोबत सिंधूने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “#traditional #dance #love #music #dancelove” यासोबतच तिने एक इमोजी देखील पोस्ट केला आहे. सिंधूच्या या व्हिडिओला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 300 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sindhu Pv (@pvsindhu1)

अनेक युजर्सला सिंधूचा हा क्यूट डान्स व्हिडीओ आवडला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसत आहात.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘कोणी इतके सुंदर कसे असू शकते.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘मॅडम कृपया तुमचा सराव करा आणि प्रशिक्षणावर लक्ष द्या.

सोमवारी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने महिला एकेरीत रौप्य पदक जिंकले होते. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिला अंतिम फेरी गाठण्यात यश आले नाही. पण कांस्यपदक मात्र मिळाले.

संबंधित बातम्या : 

“Mars Edition” tomato ketchup, आता मंगळ ग्रहावरच्या मातीत उगवलेल्या टोमॅटोपासून कॅचअप !

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

VIDEO : लळा लागला… मांजरीचं पिल्लू मालकिनीला घराबाहेर पडू देईना, नेटकरी म्हणतात, क्यूट व्हिडीओ!

(Badminton player PV Sindhu performed a special dance to the song Love Nwantinti)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.