AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : बाईक रेसमधील हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जिद्द कशाला म्हणतात, पाहा या व्हिडीओमधूनच!

प्रत्येकाला काहीतरी वेगळा छंद असतो. काही लोक त्यांचा छंद जोपासतात तर काही लोकांना जिम्मेदारी (Responsibility) आणि नोकरीमुळे आपल्या छंदापासून दूर जावे लागते. काही छंद चांगले असतात, जे लोकांना प्रेरणा देता. तुम्ही टीव्हीवर किंवा कुठेही बाइक रेस पाहिली असेल. बाईक रेस (Bike race) इतकी जास्त खतरनाक असते की बघताना अंगावर काटाच येतो.

VIDEO : बाईक रेसमधील हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, जिद्द कशाला म्हणतात, पाहा या व्हिडीओमधूनच!
बाईक रेसमधील व्हायरल होणारा व्हिडीओImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 11:17 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला काहीतरी वेगळा छंद असतो. काही लोक त्यांचा छंद जोपासतात तर काही लोकांना जिम्मेदारी (Responsibility) आणि नोकरीमुळे आपल्या छंदापासून दूर जावे लागते. काही छंद चांगले असतात, जे लोकांना प्रेरणा देता. तुम्ही टीव्हीवर किंवा कुठेही बाइक रेस पाहिली असेल. बाईक रेस (Bike race) इतकी जास्त खतरनाक असते की बघताना अंगावर काटाच येतो. बाईक रेसमध्ये सहभागी स्पर्धेक अत्यंत धोकादायक (Dangerous) पध्दतीने गाडी चालवतात. सध्या असाच एक बाईक रेसचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे.

जिद्द आणि चिकाटी कशाला म्हणतात पाहा या व्हिडीओमध्ये

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, बाईक रेसमध्ये सहभागी झालेल्या एका स्पर्धकाचा अपघात होतो. वळणावर त्याला बाईक हाताळता येत नाही आणि तो पडतो. जोरात पडूनही त्याला दुखापत होत नाही. त्यानंतर एक मिनिटांचा उशीर न करता तो लगेचच जागेवरून उठून परत त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दुसरी बाईक घेण्यासाठी पळताना दिसतो आणि दुसरी बाईक घेऊन पुन्हा स्पर्धेमध्ये सामील होतो. खरोखरच या व्यक्तीची तारीफ करायला हवी.

बाईक रेसमधील व्हायरल होणार व्हिडीओ पाहा

आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, पॅशन ही खूप मजबूत भावना आहे. 1 मिनिट 7 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 28 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे, तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी म्हटंले आहे की, जिद्द आयुष्यात खूप जास्त महत्वाची आहे.

संबंधित बातम्या : 

Video : सूट-बूट घालून पाणीपुरी विकणाऱ्या मुलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

Viral Video : नवरीचं साजरं रूप पाहून नवरदेव भावूक, केलेल्या कृतीने नवरीही लाजली…

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.